वड्याचे तेल वांग्यावर निघालं आहे, काय म्हणाले खोक्याचे वकील ?

सतीश भोसले ऊर्फ खोक्या हे राजकारणाचे बळी आहेत. तालुक्यातील वंजारी समाज एवढा निष्ठुर नाही. गुन्हेगार असेल तर त्याला सजा जरुर मिळाली पाहीजे, परंतू घर उद्धवस्त करणे हा या समाजाला सुद्धा मान्य नाही. महाराष्ट्रात खूप गुंड आहेत. परंतू महाराष्ट्रात आजवर एकाही गुंडाचे घर उद्धवस्त झालेले नाही. एक सरपंच सांगतो की सतीश भोसलेला मी पोलिस स्टेशनमध्ये जाऊन मारले आणि पुन्हा म्हणतात की सतीश भोसले मोठा गुंडा आहे. सतीश भोसलेचे जे आका…आका म्हटले जात आहेत, त्यांचा राग यांच्यावर काढला जात आहे.. वड्याचे तेल वांग्यावर निघालं आहे असे खोक्याच्या वकीलांनी म्हटले आहे.

सतीश उर्फ खोक्या भोसले याला कमीत कमी पोलीस कोठडी मागितली होती. माननीय न्यायालयाने त्यांना सहा दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे. आपल्या अशिलावर खोटा गुन्हा दाखल झाला आहे. सतीश उर्फ खोक्या भोसले त्या( बावी ) ठिकाणी नव्हताच, ते शिरुरमध्ये होते. ढाकणे पिता पूत्र जखमी झाल्याचा त्यांना फोन आल्यानंतर ते स्वत:चा पुतण्या आणि पुतणी जखमी असताना सुद्धा सतीश भोसले यांनी या पिता-पुत्रांना दवाखान्यात दाखल केल्याचे भोसलेचे वकील अंकुश कांबळे यांनी म्हटले आहे.

सतीश भोसले राजकीय बळी आहे

सतीश भोसले हे पारधी समाजाचे आहेत, आदिवासी समाजाचे आहेत, पारधी समाजाचा पोरगा महाराष्ट्रात खूप गाजतोय…इथल्या आदिवासींनी भटक्यांनी आमदाराचा कार्यकर्ता होऊ नये का ? सतीश भोसले हा राजकारणाचा बळी आहे. सरकारी पक्षाने पोलीस कोठडीची मागणी करताना त्यामध्ये एक स्विफ्ट गाडी जप्त करण्यात संदर्भात कारण सांगितले आहे.  बीडमध्ये जे सध्या जातीचे वातावरण झालंय त्याचा सतीश भोसले बळी आहे. सतीश भोसले याने सामाजिक कार्यकर्ता म्हणून खूप चांगलं काम केलं आहे. गोरगरिबांच्या मुलांना वह्या पुस्तक देण्याची कामं केली आहेत असे खोक्याच्या वकीलांनी म्हटले आहे.

सतीश भोसलेला सात दिवसांची कोठडी

भांडणात जे हत्यार ( कुऱ्हाड ) वापरली आहे ती जप्त करणे आहे,  इतर आरोपीचा शोध घेणे आहे असे सरकारी पक्षाने म्हटले आहे. आपण माननीय न्यायालयाने सांगितलं की फरार आरोपींचा शोध घेणे हा काही पीसीआरचा ग्राऊंड होऊ शकत नाही. सतीश भोसले याने हत्यारच वापरला नाही ते हत्यार जप्त कसं करता येईल असा सवाल आरोपीचे वकील अंकुश कांबळे यांनी केला आहे. दरम्यान, आरोपी सतीश भोसले याला सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश बीड कोर्टाने दिले आहेत. सतीश भोसले याला प्रयागराज येथून अटक करण्यात आली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)