उन्हाच्या झळा जाणवायला सुरूवात झाली आहे. काही ठिकाणी दुपारी बाहेर पडणे देखील अवघड होऊन बसलं आहे. अशातच लोकांनी आता कुलर, पंखे आणि एसी स्वच्छ करायला सुरूवात केली आहे. तर एसी साफ करताना या गोष्टी लक्षात ठेवा. तुमच्या घरात विंडो किंवा स्प्लिट एसी असू शकतो. या दोन्हीमध्ये, फिल्टर हा सर्वात महत्वाचा भाग आहे. फक्त फिल्टर्सद्वारेच एसी वर्षानुवर्षे चांगले काम करतो. यामुळे थंडावा मिळतो. यावेळी एसी फिल्टर साफ करताना बरेच लोकं चुका करतात. त्यामुळे फिल्टर लवकर खराब होतो. ते दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला खूप खर्च येऊ शकतो. जर तुम्हाला एसी खराब होण्यापासून वाचवायचे असेल तर या गोष्टींनी एअर कंडिशनर साफ करू नका.
चला तर मग आजच्या लेखातुन जाणुन घेऊयात एअर कंडिशनर साफ करताना ही चूक करू नये व साफ करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.
एअर कंडिशनर साफ करताना ही चूक करू नका
एअर कंडिशनर स्वच्छ करण्यासाठी कधीही वॉशिंग डिटर्जंट पावडर वापरू नये. डिटर्जंट वापरल्याने एसी फिल्टर खराब होऊ शकतो.
एसीचा फिल्टर खूप पातळ असल्याने हे साफ करताना कडक ब्रश वापरू नका. उदाहरणार्थ, कपडे धुण्याचा ब्रश एसी फिल्टरसाठी हानिकारक ठरू शकतो.
जास्त धागे असलेले कापड वापरू नका. खरं तर ज्या कापडातून धागे जास्त बाहेर पडतात त्यांच्यातील काही धागे हे तसेच तिथे राहतात त्यामुळे एसी फिल्टर खराब होऊ शकतो.
तुम्ही फिल्टर साफ करताना किंवा त्यानंतर पुसण्यासाठी फिल्टर भिंतीवर किंवा जमिनीवर आदळत असाल तर असे करणे टाळा. यामुळे तुमचा एसी फिल्टर कायमचा खराब होऊ शकतो.
एअर कंडिशनर स्वच्छ करण्याचा योग्य मार्ग
एअर कंडिशनर साफ करण्यापूर्वी, मुख्य स्विच बंद करा. फिल्टर स्वच्छ करण्यासाठी, तुम्ही व्हॅक्यूम क्लिनर किंवा कोणत्याही प्रकारचे ब्रश अटॅचमेंट वापरू शकता.
एअर कंडिशनर साफ करताना तुम्ही सौम्य डिटर्जंट किंवा डिश साबण आणि कोमट पाण्याच्या द्रावणाने फिल्टर स्वच्छ करू शकता. यानंतर ते स्वच्छ पाण्याने धुवा आणि हवेत वाळवू द्या.
एसी कॉइल्स स्वच्छ करण्यासाठी, एका स्प्रे बाटलीत गरम पाणी आणि सौम्य डिटर्जंट मिक्स करा आणि ते कॉइल्सवर लावा. यामुळे तुमचा कॉइल पूर्णपणे स्वच्छ होऊ शकतो.
एसीचे जाळे स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ब्लोअर किंवा व्हॅक्यूम क्लिनर वापरू शकता. एसी फिल्टर दर दोन आठवड्यांनी स्वच्छ करावेत.