मुंबई: वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात अतिशय घासून झालेल्या लढतीत शिंदेसेनेच्या रविंद्र वायकरांनी ठाकरेसेनेच्या अमोल कीर्तीकरांचा पराभव केला. वायकर अवघ्या ४८ मतांनी विजयी झाले. विशेष म्हणजे वायकरांना त्यांच्या विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळालेली नाही. पण त्यांनी ठाकरेसेना आणि भाजप आमदारांच्या मतदारसंघांमध्ये लक्षणीय मतं घेतली आहेत. त्यामुळे वायकरांच्या विजयानं भाजपसह ठाकरेसेनेचं टेन्शन वाढलं आहे.
वायव्य मुंबई लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या एकूण ६ जागा येतात. पैकी ३ मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार आहे. गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिमचं प्रतिनिधीत्त्व भाजप आमदार करतात. या तीनपैकी वर्सोवा सोडल्यास अन्य दोन मतदारसंघांत वायकरांनी लीड घेतलं आहे. ठाकरेसेनेच्या एका मतदारसंघात वायकर पुढे आहेत. त्यामुळे ठाकरेंची चिंता वाढली आहे.
जोगेश्वरी पूर्वचे आमदार खुद्द रविंद्र वायकर आहेत. विशेष म्हणजे इथे वायकर पिछाडीवर राहिले. ठाकरेसेनेच्या अमोल कीर्तीकरांनी इथून ११ हजारांपेक्षा अधिकचं मताधिक्क्य घेतलं आहे. त्यामुळे येत्या निवडणुकीत इथली लढत शिंदेसेनेला जड जाऊ शकते. याशिवाय दिंडोशी, वर्सोव्यात कीर्तीकरांनी आघाडी घेतली. दिंडोशीत ठाकरेसेनेचे आमदार असल्यानं कीर्तीकरांना मताधिक्क्य अपेक्षितच होतं. पण भाजपच्या भारती लवेकर आमदार असलेल्या वर्सोव्यात कीर्तीकरांनी मोठी मुसंडी मारली. इथे कीर्तीकरांनी तब्बल २१ हजारांची आघाडी घेतली. ही भाजपसाठी धोक्याची घंटा आहे.

ठाकरेसेनेकडे असलेल्या अंधेरी पूर्वमध्ये वायकरांनी १० हजार मतांची आघाडी घेतली. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत इथे शिवसेनेच्या रमेश लटकेंना ६२ हजार ७७३ मतं मिळाली होती. त्यांच्या निधनानंतर नोव्हेंबर २०२२ मध्ये मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. पक्षात पडलेल्या फुटीनंतर, मशाल चिन्हावर ठाकरेसेनेनं लढवलेली ही पहिली निवडणूक होती. ठाकरेसेनेनं इथून लटकेंच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी दिली. त्यांना ६८ हजार ६४६ मतं पडली. त्या जिंकल्या. याच मतदारसंघात वायकरांनी आता ७८ हजार ७६४ मतं घेतली. तर कीर्तीकरांना ६८ हजार ६४६ मतांवर समाधान मानावं लागलं.