महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात ११२१ उमेदवार रिंगणात होते यापैकी १०२५ उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झालं आहे.
सांगली मतदारसंघ –
सांगली मतदारसंघात चंद्रहार पाटील यांच्यासह अठरा उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये टिपू सुलतान सिकंदर, आनंदा शंकर नालगे, महेश यशवंत खराडे, पांडुरंग रावसाहेब भोसले, सतीश लतिता कृष्णा कदम, अजित धनाजी खंडादे, अल्लाउद्दीन हयातचांद काजी, डॉ. आकाश नंदकुमार व्हटकर, जालिंधर मच्छिंद्र ठोमके, तोहीद इलाही मोमीन, दत्तात्रय पंडित पाटील, नानासाो बाळासाो बंडगर, रवींद्र चंदर सोलनकर, शशिकांत गौतम देशमुख, सुवर्णा सुधाकर गायकवाड, संग्राम राजाराम मोरे.
नाशिक मतदारसंघ –
नाशिक मतदारसंघात शांतिगिरी महाराज यांच्या सह २९ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे यामध्ये अरुण काळे, अमोल कांबळे, कमलाकर गायकवाड, करण गायकर, कांतिलाल जाधव, कैलाश चव्हाण, जयश्री पाटील, अॅड. झुंजार आव्हाड, दर्शन मेढे, भाग्यश्री अडसूळ, यशवंत पारधी, वामन सांगळे, अरिफ मन्सुरी, कनोजे गिरधारी, कोळप्पा धोत्रे, गणेश बोरस्ते, चंद्रकांत ठाकूर, चंद्रभान पूरकर, जितेंद्र भाभे, तिलोत्तमा जगताप, दीपक गायकवाड, देवीदास सरकटे, धनाजी टोपले, शांतिगिरी महाराज, सचिनराजे देवरे, सिद्धेश्वरानंद सरस्वती, सुधीर देशमुख, सुषमा गोराणे, सोपान सोमवंशी.
दिंडोरी मतदारसंघ –
दिंडोरी मतदारसंघात १ लाख मते घेतलेलं बाबू भगरे यांच्या सह ८ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे. यामध्ये तुळशीराम खोटरे, किशोर डगळे, गुलाब बर्डे, मालती ढोमसे, भारत पवार, अनिल बर्डे, दीपक जगताप.
पुणे मतदारसंघ –
पुणे मतदारसंघात तिरंगी लढतीत सोशल मीडियावरील चर्चेतला चेहरा वंचित बहुजन आघाडीचे वसंत मोरे यांचेही डिपॉझिट जप्त झाले आहे. त्यांना ३२ हजार मतावर समाधान मानावं लागले.
शिर्डी मतदारसंघ –
शिर्डी मतदारसंघात तिरंगी लढतीत वंचित बहुजन आघाडीच्या उत्कर्ष रुपवते यांच्या सह ३३ उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले आहे.