भारतीय संस्कृतीत सणवार किंवा कोणतेही शुभ कार्यक्रम असले की स्त्रिया त्यांचा आवडत्या साड्या परिधान करतात. त्यात अनेक स्त्रियांची आवडती साडी म्हणजे सिल्कची साडी. सिल्कची साडी ही अशी ट्रेडिशनल आऊटफिट आहे जी प्रत्येक स्त्री परिधान करतेच. तसेच सिल्कची साडी खुप महाग असते. त्यात सिल्क साडी स्लो फॅशनचा एक भाग आहे म्हणजेच याचा अर्थ असा आहे की या साड्या पिढ्या न पिढ्या परिधान करू शकतात. त्यात महत्वाची बाब म्हणजे या सिल्कच्या साड्यांची काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. भारतातील अनेक राज्यांमध्ये सिल्कच्या साड्या बनवल्या जातात. ज्या जगभर प्रसिद्ध आहेत. बनारसी सिल्क साडी, चंदेरी साडी, कांचीपुरम साडी, आर्ट सिल्क साडी, काश्मिरी साडी, म्हैसूर आणि संबलपुरी साडी या सिल्कशिवाय अपूर्ण आहेत. या सर्व साड्याची काळजी घेणे खूप कठीण काम असते, कारण या साड्यांची चमक वर्षानुवर्ष टिकवणे हाच मोठा टास्क असतो. यासाठी तुम्ही सुद्धा कांजिवरम सिल्क साडीची चमक टिकावी याकरिता या चूका करणे टाळा आणि या टिप्स फॉलो करा.
व्हेलवेटच्या कापडात गुंडाळणे
सिल्कच्या साड्या नेहमी व्हेलवेटच्या कापडात गुंडाळाव्यात. यामुळे सिल्क कापड खराब होत नाही आणि त्याची चमकही अबाधित राहते. खरंतर ओलावा हा सिल्क साडीचा शत्रू आहे. त्यामुळे सिल्कच्या साड्या नेहमी ओलाव्यापासून दूर ठेवल्या पाहिजेत. त्या सोबत याही गोष्टी लक्षात ठेवा की या साड्या कधीही प्लास्टिकच्या कव्हरमध्ये ठेवू नयेत. यामुळे त्यांच्यात दमटपणा येऊ शकतो आणि साडी खराब होऊ शकते. याशिवाय दर 3 महिन्यांनी या साड्या पुन्हा बाहेर काढून पुन्हा घडी करा. यामुळे साडीचे कापडही खराब होणार नाही.
कपाटात सिल्कच्या साड्या ठेवू नका
इतर कपड्यांसोबत सिल्कच्या साड्या वॉर्डरोबमध्ये ठेवू नका. ते नेहमी कोरड्या जागी ठेवा. पण लक्षात ठेवा की या साड्यावर थेट सूर्यप्रकाश पडू नये. खरंतर, सूर्यप्रकाशामुळे सिल्कच्या साड्यांचा रंग हलका होऊ लागतो. त्यांना नेहमी थंड वातावरण असलेलल्या जागी ठेवा. तसेच या साड्या तुम्ही स्टोरेज बॉक्समध्ये ठेऊ शकता. त्यासोबतच तुम्ही या साड्या कोरड्या ठिकाणी ठेवता तेव्हा त्यांच्या आसपास कडुलिबांची सुकलेली पाने, लवंग किंवा सिलिकॉन जेलचे पॅकिट ठेऊ शकता. यामुळे साड्यांवर ओलावा व दमटपणा येत नाही. अशातच तुम्ही चुकूनही सिल्कच्या साडी सोबत डांबर गोळ्या ठेऊ नका. कारण या गोळ्या साडीच्या धाग्यांना लवकर खराब करतात, अशाने तुमची सिल्क साडी लवकर खराब होईल.
हँगर्स टाळा
बऱ्याच महिला सिल्कच्या साड्या कपाटात हँगर्सला लावून ठेऊन देतात. पण तुम्ही हे करू नका. साड्या जास्त वेळ हँगर्सला लावून ठेवल्याने त्यांच्यावर केलेले जड जरीकाम कापड कमकुवत करू लागते आणि साड्या सहजपणे फाटू शकतात.
सिल्क साड्यांना हवेशीर जागेत ठेवा
सिल्कच्या साड्यांना ओलावा व दमटपणा येऊ नये यासाठी त्यांना वेळोवेळी हवा देणे महत्वाचे आहे. त्यांना सूर्यप्रकाशापासून वाचवा आणि हवा मिळेल अशा ठिकाणी ठेवा. यामुळे या साडीला बुरशी लागत नाही. याशिवाय या साड्या कधीही धुवू नयेत. हमी ड्राय क्लीन कराव्यात.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही.)