फक्त बिडी-सिगारेट नव्हे तर, तुमच्या बाल्कनीत कबुतरही ठरू शकतात धोकादायक; जाणून घ्या कारण

कबुतर एक असा पक्षी आहे जो आपल्या आस-पास शांत पणे फिरताना दिसतो परंतू हाच शांत स्वभावाचा पक्षी आरोग्यासाठी घातक ठरू शकतो. कबूतरामध्ये असे काही घातक विषाणू असतात ज्यांनी आपल्याला खूप गंभीर आजारांना सामोर जाव लागु शकतं. शहरात असो किंवा खेडे गावात कबूतर सर्व ठिकाणी सहज पणे आढळतात परंतू हे पक्षी मानवी शरीराला फुफ्फुसांचे गंभीर आजार देतात.
काही घरात कबूतरांचे पालनही केले जाते परंतू कबूतराच्या पंख आणि मळा मुळे होऊ शकतो फुफ्फुसांचे आजार. त्या मूळे कबुतरांना लांब ठवण् गरजेचे आहे.

लोक फुफ्फुसांच्या आजाराचे कारण बीडी अथवा सिगरेट समजतात पण कबूतरा सारखे शांत पक्षीही शरीरासाठी घातक ठरू शकतात. कबूतराच्या शरीरावरचे बॅकटेरिया फुफ्फुसांच्या आजारपणाच एक मुख्य कारण बणू शकतं. कबूरामुळे होऊ शकतात हे आजार.

कबुतरांमुळे होणारे फुफ्फुसांचे आजार

१. हिस्टोप्लाज्मोसिस (Histoplasmosis)
हा आजार हिस्टोप्लाज्मा कैप्सुलाट नावाच्या बूरशी मुळे होतो. ही बुरशी कबुतरांच्या मळात अढळते. जेव्हा हा मळ सुखतो व याचे छोटे कण हवेत मिसळतात, श्वासाद्वारे हे शरीरात प्रवेश करतात आणि खोकला, सर्दी, ताप, श्नास घेण्याचा त्रास आसे काही आजार होतात

२.क्रिप्टोकोक्कोसिस (Cryptococcosis)
हा आजार क्रिप्टोकोकस नियोफॉर्मन्स या बुरशी मुळं होतो. हा आजार कबूतरांच्या पिसांमध्ये आढळला जातो. यामुळे ताप, सर्दी , कोरडा खोकला आणि स्नायूंमध्ये वेदना अशे लक्षण दिसतात. काही वेळा हा संसर्ग मेंदुपर्यंत पोहोचू शकतो आणि गंभीर आजारामध्ये बदलू शकतो

३. साइकोसिस (Psittacosis)
हा आजार क्लैमाइडिया साइटैसी बैक्टीरिया नावाच्या बॅकटेरीया मुळे होऊ शकतो. या आजारामुळे ताप, सर्दी , कोरडा खोकला होतो.हा आजार खतरनाक असतो व यावर वेळेवर ऊपचार न केल्यास फुफ्फुसांच्या गंभीर आजारामध्ये बदलू शकतो.

 आजारांपासून दूर रहाण्यासाठी फोलो करा या 5 टीप्स

१. कबुतरांना तुमच्यापासून लांब ठेवा
२. कबुतरांचे पंख लवकरात लवकर फेकून द्या
३. कधीही पुस्तकात कबुतरांचे पंख ठेऊ नका
४. कबुतराला हात लावल्यास तो लगेच धुवा
५. कबुतर बाल्कनीत घर बांधतील किंवा अंडी घालणार नाहीत याची काळजी घ्या

चिकण, मटणाबरोबरच खेडे गावात आणि काही शहरी भागात कबुतराचे मटण सहजपणे खाल्ले जाते. पण अश्या आजारांमुळे मग आता प्रश्र येतो तो म्हणजे हे मटण खाणे योग्य आहे की नाही ?

कबुतराचे मटण खाणे योग्य आहे की नाही ? हे काही घटकांवर अवलंबून असते

१. पोषणमूल्य (Nutritional Value)
कबुतराचे मटण आरोग्यास खूप प्रमाणात (PROTEIN) देते व (LOW FAT) असल्यामुळे पचणालाही बरे असते.
या मध्ये (IRON) आणि (ZINC) सारखे जीवनसत्त्वे असतात, जे शरीरासाठी आवश्यक असतात.

पण तरीही सध्याचं वातावरण पाहता कबुतराचे मटण खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)