शिवशाहीत धक्कादायक प्रकार,  तरुणीचा विनयभंग, संशयिताला लोकांकडून चोप, पोलिसांनी ठोकल्या बेड्या

शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. या संशयितास लोकांनी चौप दिला आहे. पोलिसांनी अटकेची कारवाई केली.

Lipi

स्वप्निल एरंडोलीकर,सांगली: पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाहीत एका तरुणीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच याच बसमध्ये विनयभंगाची घटना समोर आली. पुणे ते सांगली असा शिवशाही बसमधून प्रवास करणाऱ्या २४ वर्षीय तरुणीचा बसमधीलच प्रवास करणाऱ्या तरुणाने अश्लील चाळे करत विनयभंग केल्याची धक्कादायक घडली. पोलिसांनी संशयित वैभव वसंत कांबळे (वय ३४ रा. दुधारी मारुती मंदिर जवळ, वाळवा) याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे.

दरम्यान, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. बस स्टँडवर आल्यानंतर तरूणीनीने याबद्दल माहिती चालकाला आणि पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत संशयितास पकडले, चोपत त्याला पोलिस ठाण्यात आणले. यावेळी डायल ११२ आणि गस्ती पथक तत्काळ दाखल झाले होते. पीडितेने याबाबतची फिर्याद शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील एका गावामध्ये राहणारी २४ वर्षीय तरूणी पुण्यामध्ये नोकरीच्या निमित्ताने राहत आहे. ही पीडित तरुणी काल स्वारगेट ते सांगली या शिवशाही बसमधून गावी जाण्यासाठी सांगलीला येत होती.यावेळी इस्लामपूर जवळ संशयित वैभव कांबळे हा बसमध्ये चढला. तरूणीच्या मागील बाजूल असणाऱ्या सीटवर तो बसला होता. रात्री ११ वाजण्याच्या सुमारास बस आष्टा बस स्थानकातून सांगलीकडे येत असताना संशयित कांबळे हा वारंवार खिडकी जवळून पीडितेला स्पर्श करून अश्लील चाळे करू लागला. रात्रीची वेळ असल्याने पीडिता भयभीत झाली होती. साडेबारा वाजण्याच्या सुमारास शिवशाही बस ज्यावेळी सांगली स्थानकात आली असता पीडितेने घडलेला प्रकार चालकासह तेथील पोलिसांना सांगितला.

मात्र संशयित तेथे नव्हता त्याने तेथून पळ काढला होता. त्वरीत पोलिसांनी पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले. त्यावेळी चांगलाच चोप पोलिसांसह नागरिकांनी दिला. पीडितेचे वडिलही त्याठिकाणी आले. त्यांनीही अत्यंत संताप व्यक्त केला. अखेर रात्री उशीरा संशयिताविरोधात गुन्हा नोंद करत अटेकेची कारवाई करण्यात आला. शहर पोलिस अधिक तपास करत आहे

स्वप्निल एरंडोलीकर

लेखकाबद्दलस्वप्निल एरंडोलीकर सहारा समय मुंबईसाठी सांगलीत व्हिडिओ पत्रकार म्हणून २००९ ते २०११ या कालावधीत ३ वर्षांसाठी काम केले आहे. सांगली शहर जिल्हा रिपोर्टर म्हणून सी न्यूज चॅनेलसाठी २०१३ ते २०१९ पर्यंत काम केले आहे. जिल्हा वार्ताहर सांगली म्हणून एएम न्यूज चॅनेलसाठी २०१९ते २०२१ पर्यंत काम केले आहे. न्यूज 18 लोकमत (नेटवर्क18) स्ट्रिंगर म्हणून सांगली जिल्ह्यासाठी २०१२ ते ऑक्टो 2022-पर्यंत काम केले आहे. आता महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनसाठी जानेवारी २०२३-पासून कार्यरत आहे.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)