Sanjay Raut : ‘स्वत:चे नागडे फोटो पाठवणारे हे छोटे किरीट सोमय्या’, संजय राऊतांनी वापरले जहरी शब्द

“जयकुमार गोरेने हक्कभंग जरुर आणावा. कोणावर आणणार आहेत ते हक्कभंग, त्या महिलेवर. ज्या महिलेचा त्यांनी छळ केला, विनयभंग केला. तिला ज्या पद्धतीची छायाचित्र पाठवून अपमान केला आहे, एक प्रकारे स्वारगेट प्रकरण वेगळ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न केला असेल. कोर्टात निर्दोष सुटल्याचं कोणाला सांगता? ऑर्डर आमच्याकडेपण आहे. तुरुंगात पण गेलात तुम्ही. तरी या प्रकरणाच गांभीर्य लक्षात न घेता देवेंद्र फडणवीसांनी तुम्हाला मंत्रिमंडळात कसं काय घेतलं?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला.

“इतकं करुन आता मंत्री झाल्यावर पुन्हा त्या महिलेला त्रास देता, अशी त्या महिलेची राज्यपालांकडे तक्रार आहे. ती अबला महिला उपोषणा बसलीय, आंदोलन करतेय” असं संजय राऊत म्हणाले. “हे छोटे किरीट सोमय्या आहेत. स्वत:चे नागडे फोटो पाठवायचे, व्हिडिओ काढायचे. अशा नागड्यांना मंत्रिमंडळात घेऊन देवेंद्रजी महाराष्ट्राची काय संस्कृती देशाला दाखवताय” अशी टीका संजय राऊत यांनी केली. “आम्हा विरोधकांवर हल्ला करता. तुम्ही स्वत:कडे खाली वाकून पहा. जयुकमार गोरेंचा राजीनामा घ्यायला हवा तात्काळ. त्या महिलेशी माझं बोलणं झालं, ती महिला बोलते मी आत्महत्या करीन. ती महिला संस्कृत, खानदानी, कुटुंबवत्सल स्त्री आहे” असं संजय राऊत म्हणाले.

‘माणूस रात्री-अपरात्री अशा प्रकारे त्रास देतो’

“तीच म्हणणं आहे, हा माणूस हात धुवून माझ्यामागे लागला आहे. हा माणूस रात्री-अपरात्री अशा प्रकारे त्रास देतो. माझं जगण मुश्किल झालय. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात काम करताना आमच्यासारख्या लोकांनी गप्प बसायचं का?” असा सवाल संजय राऊत यांनी विचारला. ‘मुख्यमंत्र्यांनी जयकुमार गोरे यांचा राजीनामा घ्यायला हवा’ असं संजय राऊत म्हणाले.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)