Praniti Shinde News : राजीनामा हे केवळ नाटक, पुन्हा सहा महिन्यांनी.. ; प्राणिती शिंदेंची सरकारवर खोचक टीका

संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूरपद्धतीने करण्यात आली आहे. हा राजीनामा त्याचवेळी घेतला गेला पाहिजे होता. मात्र हे सरकार अतिशय निगरगट्ट आहे, अशी टीका कॉंग्रेस खासदार प्राणिती शिंदे यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज धनंजय मुंडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

पुढे बोलताना प्राणिती शिंदे म्हणाल्या की, हा राजीनामा देणं सुद्धा एक प्रकारचं नाटक आहे. वैद्यकीय कारणामुळे राजीनामा दिल्याचं मुंडे म्हणत आहेत. म्हणजे अजूनही त्यांनी या घटनेची नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला असं म्हंटलेलं नाही. हे कृत्य कोणी करायला सांगितलं, तो माणूस कोणाचा आहे हे जगजाहीर आहे. त्यामुळे मुंडे यांचं नाव आरोपी म्हणून सुद्धा आलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांना कोणीही पाठीशी घालण्याची गरज नाही, असंही प्राणिती शिंदे म्हणाल्या.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)