Aditya Thackeray News : पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय, आदित्य ठाकरेंची माहिती

आम्हाला पद महत्वाचं नाही तर राज्याचं हित महत्वाचं आहे, असं विधान शिवसेना उबाठा गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केलं आहे. आज ते सत्तेत आहे, उद्या आम्हीही सत्तेत येऊ, त्यावेळी ते विरोधीपक्ष पदासाठी भांडत राहतील, असंही आदित्य ठाकरेंनी म्हंटलं. उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनात महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गट विरोधीपक्ष नेतेपदावर दावा सांगणार आहे. त्याच अनुषंगाने आज शिवसेना उबाठा गटाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर शिवसेना उबाठाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते. खुर्ची आणि जागेची पदं ही येत जात असतात. आम्हाला केवळ राज्याचं हित महत्वाचं वाटतं, असं आदित्य ठाकरे यांनी म्हंटलं आहे. तसंच आजच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत असल्याचं देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)