विरोधी पक्षनेते पदावर शिवसेनेचा दावाImage Credit source: टीव्ही ९ मराठी
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडी अगोदरच विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा ठोकला आहे. संख्याबळ कमी असले तरी यापूर्वी विरोधी पक्ष नेते पद देण्याचा इतिहास त्यांनी सांगितला आणि विधानसभा अध्यक्षांनी संविधानाआधारे निर्णय द्यावा अशी मागणी केली. त्याचवेळी त्यांनी त्यांच्या जुन्या सहकाऱ्यावर टीका केली. काल रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्याला राऊतांनी खणखणीत प्रत्युत्तर दिले आहे.
ते पुन्हा मातोश्रीवर येतील
रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जिव्हारी लागणारी टीका केली होती. योगेश कदम यांच्या वक्तव्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये वाद उफळला. रामदास कदम यांनी ठाकरे यांना उद्ध्वस्त केले नाही तर नाव सांगणार नाही असे वक्तव्य केले होते. त्यांचा वक्तव्याचा समाचार घेताना, त्यांना तसे वक्तव्य करू द्या. त्यांच्या आयुष्याचे ते ध्येय असेल, असा चिमटा राऊतांनी काढला.
आमच्यात एवढं बळ आहे की ही जी विध्वंसक शक्ती आहे जे महाराष्ट्राचा विध्वंस करायला निघालेले आहे. दिल्लीच्या मोघलाई बरोबर हात मिळवणी करून त्यांना रोखण्याची आणि इथं संपवण्याची ताकद उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेमध्ये परमेश्वराने आम्हाला दिलेली आहे. हे तुमचं फडफडणं तात्पुरतं आहे. सत्ता असल्यामुळे तुमचे फडफडणे आहे. एक दिवस तुम्हाला पुन्हा मातोश्रीच्या दारात यावं लागेल. शिवसेना भवनाच्या दारात यावं लागेल, हे आपले भाकीत नाही तर दावा आहे, असे राऊत म्हणाले.
याचवेळी त्यांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर टीका केली. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. पण गृहराज्यमंत्र्यांनीच या प्रकरणाला वेगळ्या पायवाटा फोडल्या आहेत. त्यामुलीने विरोध केला नाही. त्या मुलीने प्रतिकार केला नाही, असे गृहराज्यमंत्र्यांचे म्हणणे आहे. मग तुम्ही प्रशिक्षण द्या, असा टोला त्यांनी योगेश कदम यांना लगावला. राज्याचे गृहराज्यमंत्री अंसवेदनशील असल्याचा आरोप राऊतांनी पुन्हा एकदा केला. असे मंत्री या राज्याला मिळाले हे दुर्दैव असल्याचा घाणाघात त्यांनी घातला.