प्रेमानंद महाराज कधीपर्यंत जीवंत राहतील ? अशुतोष राणा यांची धक्कादायक भविष्यवाणी ! ऐकून हैराण व्हाल

जेव्हा एखाद्या माणसाच्या ९० टक्के किडनी डॅमेज झालाय म्हणजे अशा माणसाची जगण्याची आशा धूसर असते. असेच काहीसे प्रेमानंद महाराजांबद्दल देखील बोलता येईल. त्यांना डॉक्टरांनी ते फार काळ राहणार नाहीत असे म्हटले आहे.परंतू प्रेमानंद आज २० ते २५ वर्षांपासून ठणठणीत आहेत. आता त्यांच्या बद्दल भविष्यवाणी केली गेली आहे, ही भविष्यवाणी कोणा ज्योतिषाने नव्हे ते बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणा यांनी केली आहे.

बॉलीवूड अभिनेता आशुतोष राणा अलिकडे प्रेमानंद महाराजांचे दर्शन घेतले. आशुतोष राणा यांनी प्रेमानंद यांच्या पायाला स्पर्श केला आणि त्यांना सांगितले की मी एक अभिनेता आहे. माझे नाव आशुतोष राणा आहे.माझी एक इच्छा होती तुम्हाला भेटायची. माझा मुलगा आणि पत्नीने देखील तुम्हाला नमस्कार केला आहे, त्यांना आशीर्वाद द्यावा…माझा लहान मुलगा तुमचे प्रवचन खूप ऐकतो. त्यानेही तुम्हाला चरण स्पर्श म्हटले आहे.आणि तुमच्या उत्तम आरोग्यसाठी आम्ही सर्व प्रार्थना करतोय असं आशुतोष राणा यांनी म्हटले आहे.
यावर प्रेमानंद महाराज यांनी ही सर्वा देवाची कृपा आहे.जर आपले शरीर किंवा मन आरोग्यदायी असेल तर काही फरक पडत नाही असे महाराज यावेळी म्हणाले.

पण आता विचारणार नाही

संतांची वाणी ऐकल्यानंतर अभिनेता आशुतोष राणा हसत म्हणाले की आम्हाला तर तुम्ही एकदम परम स्वस्थ वाटत आहात. यावर संत महाराज हसत म्हणाले रोज डायलिस होत आहे. तेव्हा आशुतोष म्हणाले आम्हाला तर वाटत नाही. अशा प्रकारे बराच काळ दोघांमध्ये गप्पा चालल्या. आम्हाला तर शरीर आणि आत्म्यावरुन तुम्ही आरोग्यदायी वाटता. अभिनेता आशुतोष राणा म्हणाले आधी मी तुमच्या तब्येती संदर्भात लोकांकडे चौकशी करायचो आणि पण आता विचारणार नाही. परंतू आता आम्हाला वाटते तुम्ही ८० ते ८५ वर्ष आरामात जगाल असे यावेळी आशुतोष राणा म्हणाले.

या गोष्टीलाच आता २० ते २५ वर्षे झालीत.

यावर संत महाराज जोरात हसले आणि म्हणाले अनेक वर्षांपूर्वी मला एक संत भेटले होते. त्यांनी माझ्याकडे पहात विचारले की तुम्ही एवढे चिंता कसली करत आहात? त्यावेळी मी उदास होत म्हणालो की माझ्या दोन्ही किडनी खराब झाल्या आहेत. डॉक्टरांनी माझा मृत्यू केव्हा होऊ शकतो असे म्हटले आहे. हे ऐकून ते संत म्हणाले माझे आयुष्य ८० ते ८५ वर्षे आहे. प्रेमानंद महाराज म्हणाले की या गोष्टीलाच आता २० ते २५ वर्षे झाली आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)