पुणे अत्याचाराप्रकरणी आरोपीची सुरक्षा महत्त्वाची, आमचं काय?; कोर्टाबाहेर महिला आक्रमक

पुण्याच्या स्वारगेट बलात्कार प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडे अटक करण्यात अखेर पोलिसांना यश आलं आहे. तब्बल 72 तासांच्या अथक प्रयत्नानंतर पोलिसांनी दत्तात्रय गाडेच्या मुसक्या आवळल्या. मध्यरात्रीच्या अंधारात पोलिसांनी त्याला अटक केली. दत्ता गावातच असल्याची टिप मिळाली होती. तो शेताच्या दिशेने गेल्याचंही पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याला चारही बाजूने घेरण्यात आले आणि अखेर दत्तात्रय गाडेने शरणागती पत्करली. आज त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. आता पुणे कोर्टाबाहेर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे.

पुण्यातील स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. त्याला कोर्टात घेऊन जाण्यासाठी पुणे पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहे, त्या वाहनाच्या मागेपुढे पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्या असणार आहे. आरोपीला कोर्टात घेऊन जाण्यापूर्वी वरिष्ठ अधिकारी लष्कर पोलीस ठाण्यात आले आहेत. काही वेळात आरोपीला लष्कर पोलीस ठाण्यातून शिवाजीनगर कोर्टात घेऊन जाण्यात येणार आहे. यावेळी पिंजरा वाहनासह आरोपीला ज्या वाहनातून घेऊन जाणार आहेत त्या वाहनाच्या पुढे मागे पोलिसांच्या गाड्या असतील, अशी माहिती समोर आली आहे.

पुण्यात घडलेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी आणि आरोपीला देण्यात येणाऱ्या सुरक्षेवरुन राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या महिला आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पुण्यातील शिवाजीनगर कोर्टाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. पुण्यात शिवाजीनगर कोर्टाबाहेर मोठ्या प्रमाणात महिलांचा जमाव पाहायला मिळत. पोलिसांनी या महिलांना आरोपीच्या सुरक्षेसाठी तुम्ही इथे थांबू शकत नाही, असे सांगितले. त्यावरुन या महिलांनी आरोपीची सुरक्षा महत्त्वाची आहे आणि आमच्या सुरक्षेचे काय? आम्हाला पोलीस या ठिकाणावरुन जायला सांगतात, पोलीस आम्हाला पोलीस स्टेशनला नेतात, पण यामागचे कारण काही नाही, असा सवाल महिला पदाधिकाऱ्यांनी केला.

बातमी अपडेट होत आहे…

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)