परळीमध्ये 109 अज्ञात मृतदेह सापडले असल्याचा खळबळजनक दावा खासदार बजरंग सोनवणे यांनी केला आहे. तर त्यांचा मर्डर झाला की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं देखील सोनवणे यांनी म्हंटलं आहे. खासदार बजरंग सोनवणे यांच्या या धक्कादायक दाव्यामुळे आता चर्चांना सुरुवात झाली आहे.
याविषयी बोलताना सोनवणे यांनी सांगितलं की, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे केवळ 4 ते 5 घटना समोर आलेल्या आहेत. मात्र बीड जिल्ह्यात असे 109 मृतदेह सापडलेले आहेत, ज्यांच्याबद्दल अद्यापही कोणती माहिती समोर आलेली नाही. या मृतांचा मर्डर झालाय की त्यांना हृदयविकाराचा झटका आला, याबद्दल कोणतीही माहिती मिळालेली नाही. मात्र अशा 109 मृतदेहांचे पंचनामे करण्यात आलेले आहेत. याला बीड जिल्हयाबद्दल असलेली राजकीय उदासीनता जबाबदार आहे. राजकीय नेत्यांचा पाठिंबा असल्याने या घटना घडत असल्याचं नागरिकांचं म्हणण असल्याचं देखील बजरंग सोनवणे यांनी म्हंटलं आहे.