Santosh Deshmukh Death Case : दीड हजार पानांचं आरोपपत्र घेऊन सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल

संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीचं पथक बीडमध्ये दाखल झालं आहे. विशेष मकोका कोर्टात आज आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे. जवळपास दीड हजार पानांचं हे आरोपपत्र आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात आणि वाल्मिक कराड आरोपी असलेल्या खंडणी प्रकरणात तपास सीआयडी आणि एसआयटीकडून करण्यात आलेला आहे. या तपासानंतर सर्व गुन्ह्यांचं जवळपास 1500 पानांचं आरोपपत्र तयार करण्यात आलेलं आहे. हे आरोपपत्र बीडच्या विशेष मकोका कोर्टात दाखल केलं जाणार आहे. त्यासाठी आज सीआयडीचे पथक बीडमध्ये दाखल झालेले आहे. सरकारी वकील बाळासाहेब कोलीते देखील याठिकाणी पोहोचलेले आहेत. सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बसवराज तेलीसुद्धा बीडमध्ये आलेले आहेत. हे आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कोर्टाकडून त्याला कॉग्नीझन्स मंजूरी दिली जाईल. मंजूरी मिळाल्यानंतर हे आरोपपत्र आरोपीच्या वकिलांना आणि आरोपींना देखील वाचण्यासाठी मिळेल. यानंतर हा खटला कोर्टात चालेल. विशेष सरकारी वकील उज्वल निकम हे हा खटला चालवणार आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)