विशाल पाटील हे पहाटेच पुण्याच्या दिशेने रवाना झाले. तेथून ते विश्वजीत कदमांसोबत मुंबईला जातील. उद्या मुंबईत काँग्रेसची महत्त्वाची बैठक होणार आहे. विशाल पाटील हे तांत्रिकदृष्ट्या अपक्ष खासदार आहेत, खरंतर ते काँग्रेसचेच अधिकृत खासदार असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता विशाल पाटील हे मुंबईतील काँग्रेसच्या बैठकीतही सामील होणार आहेत. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.
सांगलीत महाविकास आघाडीने शिवसेनेच्या चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे विशाल पाटील हे नाराज झाले होते. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि ते मोठ्या मताधिक्क्याने जिंकून आले. निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरे, विशाल पाटील आणि विश्वजीत कदम याच्यात जी नाराजी झाली होती, हे नाराज कमी करण्यासाठी ही बैठक होत असल्याची चर्चा आहे.
महाविकास आघाडीत पुढे सांगलीच्या जागेवरुन कुठलाही वाद होणार नाही, असं विश्वजीत कदम यांनी निकाल लागल्यानंतर सांगितलं होतं. त्यामुळे या बैठकीत विशाल पाटील आणि उद्धव ठाकरेंमदील वाद संपवला जाईल, असंही सांगितलं जात आहे.