Amla Tea: दररोज सकाळी रिकाम्या पोटी ‘ही’ ड्रिंक प्या; पिंपल्सच्या समस्या दूर करा

सकाळी रिकाम्या पोटी ‘ही’ ड्रिंक प्या Image Credit source: Instagram

निरोगी आरोग्यासाठी तुमच्या आहारात पोषक तत्वांचा समावेश करणे गरजेचे असते. तुमच्या आहारामध्ये फायबर, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए, जिवनसत्वे आणि प्रोटिनचा समावेश करणे गरजेचे असते. धावपळीच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्या पिण्याच्या सवयींमुळे तुमच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. तुम्ही तुमच्या दैनंदिन आहारामध्ये आवळ्याचा समावेश करू शकता. आवळ्याचे सेवन तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्वं आणि अँटिऑक्सिडेंट्स असतात ज्यामुळे तुमचं आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. आयुर्वेदामध्ये आवळ्याला विशेष महत्त्वं दिले जाते. चला तर जाणून घेऊया आवळ्याचा ज्यूस पिण्याचे फायदे.

आवळ्याची चव तुरट जरी असेल तरी त्याचा तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. अनेकांना त्याच्या तुरट चवीमुळे अनेकजण ते खाणं टाळतात. पंरतु आता तुम्ही आवळ्याची चव बदलून त्याचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. आवळ्याच्या चहाचे सेवन केल्यास तुमच्या आरोग्याला अनेक फायदे होतात. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे जंक फूडचे जास्त प्रमाणात सेवन केला जातो. जंक फूड खाल्ल्यामुळे पोटासंबंधित समस्या उद्भवू शकतात.

आवळ्याचा चहा प्यायल्यामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते. रोगप्रतिकारकशक्ती वाढल्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचे संसर्गाचे आजार होत नाही. बदलत्या ऋतूमध्ये सर्दी खोकला आणि ताप यांच्या सारख्या समस्या होऊ शकतात. परंतु तुम्ही जर नियमित आवळ्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे या सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. आवळ्यामध्ये असलेले अँटिऑक्सिडेंट्स तुमच्या पेशींना मुक्त रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसापासून वाचवतात, ज्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. जंक फूड जास्त प्रमाणात खाल्ल्यामुळे तुमचं वजन वाढतं आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते. परंतु तुम्ही जर वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही आवळ्याच्या चहाचा सेवन करू शकता. आवळ्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते ज्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होतो आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. तुम्हाला जर अपचन किंवा पोटा संबंधित समस्या असतील तर तुम्ही आवळ्याच्या चहाचे सेवन करू शकता. याचे सेवन केल्यामुले तुम्हाला पोटफूगी, अम्लका, बद्धकोष्ठता आणि पोट दुखीच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

आवळ्याचा चहा सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याच्या चहाचे सेवन केल्यामुळे तुमच्या शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकते आणि तुमचं शरीर डिटॉक्सिफाय करते. आवळ्याचे सेवन केल्यामुळे तुमच्या आतड्यांचे आरोग्य निरोगी राहाण्यास मदत होते. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी, तुमच्या शरीरामध्ये कोलोजनची मात्रा वाढवण्यास मदत करते ज्यामुळे तुमची त्वचा घट्ट होते आणि त्वचा तरूण राहाते. व्हिटॅमिन सीमुळे तुमच्या त्वचेवर चमक येते आणि पिंपल्सच्या समस्या दूर करण्यास मदत करते. आवळ्याचा चहा तुमच्या चेहऱ्यावरील डाग डिटॉक्सिफाय करण्यास मदत करते.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)