मोठी बातमी समोर येत आहे, आता मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याचा ठराव घेण्यात आला आहे. विद्रोही साहित्य संमेलनामध्ये एकूण 29 ठराव घेण्यात आले, त्यामध्ये मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात यावा, असा ठराव देखील घेण्यात आला आहे. त्यामुळे आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यात आहे.
मोठी बातमी! विद्रोही साहित्य संमेलनात धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा ठराव
