फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पाक्षच्या चतुर्दशीला महाशिवरात्र हा सण साजरा केला जातो. हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी महाशिवरात्र हा सण २६ फेब्रुवारी २०२५ रोजी म्हणजे बुधवारी साजरा होणार आहे. शिवरात्रीच्या मुहूर्तावर अनेकजण पांढरे कपडे घालून, उपवास करून भगवान शिवाची पूजा करताना दिसतात. महाशिवरात्रीच्या शुभ प्रसंगावर भगवान शिवची विशेष उपासना केली जाते. भक्त या दिवशी भगवान शंकराला प्रिय असणाऱ्या गोष्टी देतात आणि आशीर्वाद घेतात. जर तुम्ही देखील मंदिरात जाणार असाल तर भगवान शंकराला कोणती फुले वाहू नयेत हे जाणून घ्या…
हिंदू धर्मामध्ये पूजा करताना देवाला फुले वाहिली जातात. महाशिवरात्रीला देखील भक्त पांढऱ्या रंगाची फुले शिवलिंगावर वाहताना दिसतात. पण तुम्हाला माहिती आहे का भगवान शंकराला काही अशी फुले आहेत जी अजिबात आवडत नाहीत. आता ही फुले कोणती चला जाणून घेऊया…
कोणत्या फुलांचा वापर करावा?
शमीचे फुल : महादेवाला शमीचे फुल हे बेलपत्राइतकेच आवडते. त्यामुळे शमीचे फूल शिवलिंगावर वाहून तुम्ही तुमची इच्छा मागू शकता.
रुईचे फूल : भगवान शंकराची पूजा करताना रुईचे फूल वाहिल्यास आपली इच्छा पूर्ण होते असे म्हटले जाते. त्यामुळे महाशिवरात्रीला पूजा करताना रुईचे फूल नक्की वापरा
कणेरी फुल : शिवाच्या पूजेमध्ये कणेरी फुल असणं हे शुभ मानले जाते. असे म्हटले जाते की पांढरे आणि लाल फुल वाहिल्यामुळे देव प्रसन्न होतो.
धतुरा फुल : धतुरा ही भगवान शिव यांच्या प्रिय गोष्टींपैकी एक आहे. असे मानले जाते की शिवलिंगवर धतुराची फुल वाहताच एखाद्या व्यक्तीला पुण्य लागते.
कोणती फुले वाहू नयेत?
सूर्यफूल : शिवलिंगावर सूर्यफूल वाहण्यास मनाई केली जाते. कारण सूर्यफूल हे शाही मानले जाते. त्यामुळे शाही स्वरुपाशी संबंधित असलेल्या गोष्टी शिव पूजेमध्ये वापरल्या जात नाहीत.
कमळ फूल : भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना आपण कमळाचे फूल वाहतो. त्यामुळे शिवलिंगावर कधीही कमळ फूल ठेवू नये असे म्हटले जाते.
कंटकारी फूल : धतुराशिवाय कोणतेही काटेरी फुल भगवान शिव यांना देऊ नये असे म्हटले जाते. हे फूल वाहिल्यास कुटुंबात मतभेद होण्याची शक्यता असते.