शिवसेनेबाबत वक्तव्यानंतर नीलम गोऱ्हे अडचणीत? ठाकरे गटाकडून अशी तयारी, आता थेट…

UDDHAV THACKERAY ON NEELAM GORHE: शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीतील साहित्य संमेलनात ठाकरे यांच्या शिवसेनेबद्दल विधान केले. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळत असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हटले. त्यावरुन राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. नीलम गोऱ्हे यांच्या वक्तव्याच्या समाचार शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी घेतला. तसेच त्यांना या प्रकरणात कोर्टात खेचण्याचा इशारा दिला.

शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर म्हणाल्या, नीलम गोऱ्हे या आरपीआय आठवले गटाच्या होत्या. त्या नंतर शिवसेनेत आल्या. शिवसेनेत पदासाठी दोन मर्सिडीझ द्याव्या लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. ते त्यांनी त्या पुराव्यानीशी सिद्ध करून दाखवावे, अन्यथा आम्ही ठाकरेंची महिला संघटना त्यांना सोडणार नाही. आम्ही त्यांच्याविरोधात कोर्टात जाऊ, असे शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी नीलम गोऱ्हे यांना ४ वेळा विधानपरिषद दिले. त्यानंतरही त्यांना काय कमी पडले? असा प्रश्न विचारत किशोरी पेडणेकर म्हणाल्या, तू तिथे गेली आहेस ना, मग आता त्या ठिकाणी सुखात रहा, असे त्यांनी म्हटले.

नीलम गोऱ्हे जोरदार टीका

नीलम गोऱ्हे यांनी केलेले राजकीय विधान हे साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर केले. त्या व्यासपीठावर असले विचार काय व्यक्त करतात? कुठे काय बोलावे याचे भान त्यांना नाही. त्या XXरी आणि XXXक आहेत. त्यांचा उद्योग सगळ्या राज्याला माहीत आहे. त्या चुगलीखोर बाई आहेत. मातोश्रीवर बसून त्या उद्धव ठाकरे यांची चुगली करत बसत होत्या. त्यांनी पक्षात काड्या लावण्याचे कामे केली होती. याबाबत तुम्ही आशा मामेडी यांना जाऊन विचारा, असे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले.

माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका

माणिकराव कोकाटे यांना शिक्षा झाल्यावर त्यांनी राजीनामा दिला नाही. त्यावर बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, आता नैतिकता काही उरली नाही. मविआचा सरकार असताना आम्ही संजय राठोड यांचा राजीनामा घेतला होता. गीता आणि संविधानावर हात ठेवून आपण शपथ घेतो. त्याचे काही महत्व आता उरणार नाही. अजित पवार यांनी सांगितला की मी नैतिकतेच्या मुद्द्यावरून राजीनामा दिला होता, पण आता त्यांच्याच पक्षाचे धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेत नाही? असा प्रश्न पेडणेकर यांनी विचारला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)