एकनाथ शिंदेंच्या विश्वासू शिलेदाराकडून अखेर ‘मोहीम फत्ते’; ठाकरे गटाला सर्वात मोठा दणका, मोठी बातमी समोर

लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीनं महायुतीला मोठा धक्का दिला होता. महायुतीच्या अनेक दिग्गजांना पराभवाचा सामना करावा लागला, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. त्यानंतर महाविकास आघाडीमधील अनेक नेते सध्या महायुतीमध्ये विशेष करून भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करताना दिसत आहेत. याचा सर्वात मोठा फटका बसला आहे तो म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाला. विधानसभा निवडणुकीपासून पक्षात सुरू झालेली गळती अजूनही सूरच आहे. आतापर्यंत अनेक नेते आणि पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का    

पूर्वी विदर्भात शिवसेनेचं ‘ऑपरेशन टायगर’ सक्सेसफूल झालं आहे. शिवसेना ठाकरे गटाला खिंडार पडलं असून, आज शिवसेना ठाकरे गटाचे अनेक नेते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे पूर्व विदर्भ संघटक आणि एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय किरण पांडव यांनी विदर्भात ठाकरे गटासह काँग्रेस आणि मनसेला मोठा धक्का दिला आहे.  शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या आणि सेलूच्या नगराध्यक्ष स्नेहल अनिल देवतरे या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.  ठाकरे गटाचे चंद्रपूर शहर प्रमुख दिपक बेले, यांच्यासह  वर्ध्याचे उपजिल्हाप्रमुख  अनिल देवतारे हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

आज नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. आज एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये ठाकरे गटातील वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली  आणि नागपूरमधील पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. सोबतच शिवसेनेनं मनसेला देखील धक्का दिला आहे.  मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष किशोर सरासकर यांच्यासह   नागपूर ग्रामीण जिल्हा प्रमुख दिलीप गायकवाड आज शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ शकतात, असे संकेत मिळत आहेत. या पार्श्वभूमीवर हा ठाकरे गटासाठी विदर्भात मोठा धक्का मानला जात आहे. या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेची ताकत आणखी वाढणार आहे. पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आवाहन आता उद्धव ठाकरे यांच्यासमोर असणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)