डार्क सर्कल कमी करण्यासाठी ‘या’ 4 नैसर्गिक गोष्टींचा असा करा वापर

डोळ्यांखाली काळी वर्तुळे असणे ही एक सामान्य समस्या बनली आहे. तणाव, झोप न लागणे, अनहेल्दी पदार्थांचे सेवन आणि इतर अनेक कारणांमुळे तुमच्या डोळ्याखाली काळे वर्तुळे तयार होतात. या काळ्या वर्तुळांमुळे चेहऱ्याची चमक नाहीशी झाल्याने चेहरा निस्तेज दिसायला लागतो. त्यामुळे अशा परिस्थितीत ऐन कार्याक्रमावेळी ही काळी वर्तुळे लपवण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या महागड्या प्रॉडक्टचा वापर करतात. परंतू काही दिवसांनी ही काळी वर्तुळे आणखीण गडद दिसू लागतात. पण तुम्हाला माहित आहे का की काही घरगुती गोष्टींनी तुम्ही डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करू शकता. आपल्या स्वयंपाकघरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या गडद डाग कमी करण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. चला जाणून घेऊया किचनमध्ये असलेल्या कोणत्या गोष्टी काळी वर्तुळे कमी करण्यात मदत करतात.

बदाम तेल

बदामाचे तेल काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. या तेलामध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटिऑक्सिडंट असतात, जे त्वचेचे पोषण तसेच रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतात. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो, त्यामुळे तुमच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी होतात.

रात्री झोपण्यापूर्वी बदामाच्या तेलाचे काही थेंब डोळ्यांखाली लावा.

हलक्या हाताने मसाज करा आणि रात्रभर राहू द्या.

सकाळी उठल्यानंतर ते धुवा.

याचा नियमित वापर केल्याने डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी होतात.

काकडी

काकडी ही एक नॅचरल ब्युटी ट्रीटमेंट आहे. जी त्वचेला थंडावा आणि आराम देते. काकडीत असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला हायड्रेट करतात आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात.

काकडीचे थंड काप डोळ्यांखालील सूज आणि थकवा देखील दूर करतात.

काकडीचे तुकडे करा आणि थंड होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

नंतर हे थंड तुकडे 10-15 मिनिटे डोळ्यांखाली ठेवा.

यानंतर डोळे कोमट पाण्याने धुवा.

काळी वर्तुळे कमी करण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे.

कोरफड

कोरफडीच्या गुणधर्मांबद्दल सर्वांनाच माहिती आहे. यात दाहक-विरोधी आणि हायड्रेटिंग गुणधर्म आहेत, जे त्वचेचे पोषण करण्यास आणि काळी वर्तुळे कमी करण्यास मदत करतात. कोरफड जेल त्वचेला शांत करते आणि डोळ्यांखालील सूज कमी करते.

कोरफडीच्या ताज्या पानातून जेल काढा आणि डोळ्यांखाली हलक्या हाताने लावा.

15-20 मिनिटे राहू द्या आणि नंतर स्वच्छ धुवा.

नियमित वापराने काळी वर्तुळे कमी होतात.

टी बॅग्स

विशेषतः हिरवा किंवा काळा चहा असलेल्या टी बॅग्स या डोळ्याखालील काळी वर्तुळे कमी करण्यासाठी खूप प्रभावी आहेत. त्यात टॅनिन, अँटिऑक्सिडंट्स आणि कॅफीन असतात, जे डोळ्यांभोवतीची त्वचा टोनिंग आणि रक्त परिसंचरण सुधारण्यास मदत करतात. ते डोळ्यांची सूज आणि थकवा देखील कमी करतात.

टी बॅग्स थंड होण्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा.

नंतर या थंड चहाच्या पिशव्या डोळ्यांवर ठेवा आणि 15-20 मिनिटे विश्रांती घ्या.

असे रोज केल्याने काळी वर्तुळे कमी होण्यास मदत करतात.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)