18 Feb 2025 08:59 AM (IST)
ठाणे- 34 हजार 782 शिधापत्रिका विविध कारणांनी केल्या रद्द
ठाणे- 34 हजार 782 शिधापत्रिका विविध कारणांनी रद्द केल्या आहेत. त्यामुळे या कार्डधारकांना स्वस्त रेशनचा लाभ ही आता नाकारण्यात आला आहे. सरकारी धोरणानुसार सर्व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना पांढरी शिधापत्रिका दिली आहे. त्यामुळे या शिधापत्रिकेवर कोणत्याही प्रकारचे स्वस्त धान्य वितरित करण्यात येत नाही. आधार कार्डशी संलग्न करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
18 Feb 2025 08:44 AM (IST)
ठाणे- सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी आंदोलनाचा इशारा
ठाणे- सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसाठी आंदोलनाचा इशारा देण्यात आला. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीसह इतर देण्याची रक्कम सेवानिवृत्तीच्या वेळी देण्यास प्रशासन टाळाटाळ केली तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कामगार संघटना मुन्सिपल लेबर युनियनने दिली आहे. कामगार नेते युनियनचे अध्यक्ष रवी राव यांच्याकडे पुन्हा अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे.
18 Feb 2025 08:34 AM (IST)
ठाण्यात 195 घर खरेदीदारांची 144 कोटींची भरपाई थकली
ठाण्यात 195 घर खरेदीदारांचे 143.67 कोटी रुपये नुकसान भरपाई थकली असून यापैकी फक्त पाच विकासकाकडे 107 कोटी रुपये अडकलेले आहेत. ही रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने वसूल करण्यासाठी विशेष प्रयत्न केले तर एकूण रकमेच्या तब्बल 75 टक्के रक्कम वसूल होऊन अनेक घर खरेदीदारांना दिलासा मिळणार आहे.
18 Feb 2025 08:27 AM (IST)
नाशिक- शिवजयंतीच्या मिरवणुकीत डीजे लेझर नको, पोलिसांच्या सूचना
नाशिक- शिवजयंतीच्या मिरवणुकीत डीजे लेझर नको, अशा सूचना शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी दिल्या आहेत. नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. डीजे लेझर यासह ध्वनी क्षेपकांच्या मर्यादांचे पालन करणे प्रत्येक मंडळाला बंधनकारक आहे. मिरवणुकी दरम्यान टवाळखोरांवर वॉच ठेवण्यासाठी निर्भया दामिनी पथक नेमणार आहेत.
18 Feb 2025 08:26 AM (IST)
पुणे- पाणीटंचाईबाबत मोठा दिलासा देणारी बातमी
पुणे- पाणीटंचाईबाबत मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. राज्यातील पाणीटंचाईची चिंता मिटली आहे. ३४९ तालुक्यातील भूजलसाठ्यात वाढ झाली आहे. केवळ खटाव, डहाणू, जव्हार, बल्लारपूर तालुक्यात पाणीटंचाईचे संकेत आहेत.
18 Feb 2025 08:25 AM (IST)
सुप्रिया सुळेंच्या दौऱ्याबाबत धनंजय देशमुखांची प्रतिक्रिया
सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याबाबत धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “आमच्या ज्या काही अडचणी आहेत, सुरुवातीचा घटनाक्रम, ग्राऊंड लेव्हलला सुरू असलेली दहशत, गुंडगिरी, अपहरण खंडणी, खून हे कशामुळे आणि कोणामुळे चालू होतं या संदर्भात आम्ही चर्चा करणार आहोत. गावकऱ्यांच्या भूमिकेशी मी सहमत असतो, गावकरी जे निर्णय घेतील त्यावरून पुढील दिशा ठरते.”