कोणतं अंड जास्त पावरफूल, पांंढरं की तपकिरी? काय आहे दोन्हीमध्ये फरक

असं मानलं जातं की ब्राऊन अंडं हे पांढर्‍या अंड्यापेक्षा जास्त पौष्टिक असतं, त्यामुळे हे अंड जास्त पावरफूल असतं. त्यामुळेच ब्राऊन अंड्यांची किंमत ही सामान्य पांढर्‍या अंड्यापेक्षा जास्त असते. सामान्यपणे ज्यांना आपले मसल्स बनवायचे असतात,ते लोक जास्तीत जास्त ब्राऊन अंडी खातात. अंड अशी गोष्ट आहे, ज्यामध्ये प्रत्येक प्रकारचे पौष्टिक तत्व उपलब्ध आहेत. त्यामुळेच त्याला पोषण तत्त्वाचा खजाना देखील मानलं जातं.मात्र आता प्रश्न असा आहे की कोणतं अंड हे जास्त पोष्टिक असतं. खरच ब्राऊन अंड हे पांढऱ्या अंड्यापेक्षा जास्त पावरफुल असंत का? या गोष्टीवरून जर तुम्हालाही कंफ्यूजन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी

ब्राऊन आणि पांढऱ्या अंड्यामध्ये काय आहे फरक?

अंड ही सहज आणि कुठेही मिळणारी वस्तू आहे. अंड्याला पौष्टीक तत्त्वाचा खजिना मानलं जातं.अंड्याची किंमत देखील कमी असते त्यामुळे त्याला कोणीही खरेदी करून खाऊ शकतं.अंड्यामध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन आणि मिनिरल्सचा खजाना असतो. तुम्हाला कोणतं अंड आवडतं ब्राऊन की पांढरं? त्यापूर्वी हे जाणून घ्या की पांढऱ्या आणि तपकिरी अंड्यामध्ये नेमका काय फरक आहे. या दोन अंड्यांच्या रंगामध्ये फरक आहे कारण अंडे देणाऱ्या कोंबडीच्या जातीमध्ये फरक आहे. जी कोंबडी पांढरं अंडे देती त्या कोंबडीचे पंख हे पांढरे असतात. तर जी कोंबडी तपकिरी कलरचे अंडे देती तिचे पंख हे थोडेसे लालसर कलरचे असतात.

ब्राऊन अंड जास्त पौष्टिक असतं?

काही लोक विचार करतात की ब्राऊन अंड हे पांढऱ्या अंड्यापेक्षा जास्त पौष्टीक असतं? मात्र हा त्यांचा मोठा गौरसमज आहे. अंडं किती पौष्टिक आहे हे अंड्यांच्या कलरवर नाही तर कोंबडीच्या डायटवर अवलंबून असंत. उदाररण द्यायचं झाल्यास जर कोंबडी कडधान्य आणि इतर भाजीपाल्याचे अवशेष खात असेल तर तिच्या अंड्यामध्ये ओमेगा 3 आणि व्हिटॅमीन डी मोठ्या प्रमाणात असतं. त्यामुळे ब्राऊन आणि पांढरं अंडं हे सारखंच पौष्टीक असतं.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)