World Travel & Tourism Festival: ट्रॅव्हलर ब्लॉगर अर्चना सिंह यांनी सोलो ट्रॅव्हलसाठी दिल्या टिप्स

नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद स्टेडियमवर ‘वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल’ सुरू आहे. तीन दिवशीय या महोत्सवाचा 16 फेब्रुवारी हा शेवटचा दिवस आहे. देशातील सर्वात मोठे न्यूज नेटवर्क Tv9 आणि Red Hat Communication द्वारे आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे लोकांकडून खूप कौतुक होत आहे. या महोत्सवात मोठ्या प्रमाणावर लोक येत आहेत. या महोत्सवात ट्रॅव्हलर ब्लॉगर अर्चना सिंह यांनी सोलो ट्रॅव्हलसाठी महत्वाच्या टिप्स दिल्या.

अर्चना सिंह यांनी सांगितले अनुभव

द वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल 2025 मधील ट्रॅव्हल टॉक दरम्यान अर्चना सिंह यांनी महिलांबद्दल अनेक गोष्टी शेअर केल्या. सुरक्षित प्रवास आणि स्मार्ट प्रवास याबाबत त्यांनी माहिती दिली. प्रसिद्ध ट्रॅव्हल ब्लॉगर आणि ओन्ली वन ट्रॅव्हलच्या संचालिका असलेल्या अर्चना सिंह यांनी वर्ल्ड ट्रॅव्हल अँड टुरिझम फेस्टिव्हल 2025 मधील अनुभव सांगितले. अर्चना सिंह यांनी 2017 मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रातून निवृत्ती घेतली. त्यानंतर पूर्ण-वेळ त्या ट्रॅव्हल ब्लॉगर झाल्या. त्यांनी सात खंडांमधील 107 देश एक्सप्लोर केले आहेत. त्यांनी महोत्सवात आपणास प्रवास करायला खूप आवडत असल्याचे सांगितले.

कोणते देश सुरक्षित

अर्चना सिंह यांनी अनुभव सांगताना सांगितले की, जपान, श्रीलंका आणि सिंगापूर हे देश महिला प्रवाशांसाठी सर्वात सुरक्षित देश आहेत. पण एकट्याने कुठेही प्रवास करताना स्वतःच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी लागते. सर्वप्रथम त्याने प्रवास करण्याचे ठिकाणी आणि त्या ठिकाणी राहण्यासाठी सुरक्षित ठिकाण निवडायला हवे. सहलीचे नियोजन करताना कुटुंबासोबत जोडलेले राहणे आणि त्या ठिकाणाची माहिती मिळवणे महत्त्वाचे आहे. आजच्या माहिती युगाच्या काळात तुम्हाला अनेक ठिकाणांची माहिती ऑनलाइन सहज मिळू शकते. तसेच तुम्ही कोणाकडूनही त्याबद्दल जाणून घेऊ शकता. ज्यांना एकट्याने प्रवास करायचा असेल त्यांनी स्मार्ट योजना तयार करावी, असा सल्ला अर्चना सिंह यांनी दिला.

ही माहिती घ्या…

महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पॅनल चर्चाही झाली. या काळात अनेक जणांनी त्यांचे अनुभव कथन केले. तुम्ही देखील सोलो ट्रिप करायची असेल तर स्मार्ट पद्धतीने नियोजन करा. कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वी मार्ग आणि ठिकाण दोन्हींची योग्य माहिती घ्या. तुम्ही ज्या ठिकाणी सोलो ट्रिपला जाणार आहात, त्या ठिकाणचे नियम पाळा. या महोत्सवाच्या पहिल्या दोन दिवसांमध्ये विविध विषयांवर कार्यशाळा झाल्या. पॅनल चर्चा झाली. त्यानंतर आज तिसऱ्या दिवशी समारोप झाला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)