सोन्याचा चमचा घेऊन आम्ही जन्माला आलो नाही. लोकांना सोन्याचे दिवस दाखविण्यासाठी आम्ही राजकारणात आलो आहोत. आमची सुरुवात अडीच वर्षांपूर्वी झाली. तो वेग आता आपल्याला दाखवायचा आहे. आता आम्ही घरात बसून सरकार चालवले नाही, लोकांसाठी रस्त्यावर फिरलो. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी चर्चा केली असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले. आम्ही विकासाची कोणती योजना बंद करणार नाही.आम्ही खोटी आश्वासने देत नाही जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत असेही शिंदे यांनी सांगत लाडकी बहिण यासह इतर योजना सुरुच राहतील हे स्पष्ट केले आहे.
सर्व योजना सुरु राहणार
रत्नागिरीतील सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रामदास कदम यांच्या मतदार संघात सभा घेतली त्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की होती दाढी होती म्हणून तुमची उद्धवस्त झाली महाराष्ट्र विरोधी आघाडी. आणि सुरू झाली विकासाची आघाडी. कशाला माझ्या नादाला लागता. मी कुणाच्या नादी लागत नाही. मी आरोपाला उत्तर देत नाही. मी कामातून उत्तर देतो. विकासाची कोणतीही योजना बंद होणार नाही. आम्ही खोटी आश्वासने देत नाही. जे बोलतो ते आम्ही करून दाखवतो. आम्ही पूर्ण विचार करून योजना केल्या आहेत.
‘रश्शी जळाली पण पिळ जात नाही’
राजकारणात पदं वर खाली होतात. पण एकनाथ शिंदे यांना ‘लाडका भाऊ’ ही नवीन ओळख मिळली. ही सर्व पदांपेक्षा मोठी आहे. याचं मला समाधान आहे. मला अभिमान आहे. माझ्या रक्तातील थेंब असे पर्यंत महाराष्ट्रासाठी समर्पित भावनेने काम करेल. खोके खोके बोलत असतात. या महाराष्ट्राने तुम्हाला घरी बसवलं. तरीही त्यांना कळत नाही. ‘रश्शी जळाली पण पिळ जात नाही’ अशी यांची अवस्था आहे असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी टीका करताना म्हटले.
दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका
कोण एकनाथ शिंदे, कोण रामदास कदम असं म्हणायचे. आम्ही करून दाखवलं. आम्हाला हलक्यात घेऊ नका. आम्ही काम करणारे कार्यकर्ते आहोत. दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका.
किती शिव्या देणार, किती आरोप करणार. माझा सत्कार झाला. महादजी शिंदे यांच्या नावाचा पुरस्कार मिळाला. एका मराठी माणसाच्या हस्ते मराठी माणसाचा सत्कार झाला. महाराष्ट्राला अभिमान आहे. एकनाथ शिंदेंवर टीका करा. आरोप करा. शिव्या द्या. पण तुम्ही महादजी शिंदेंचा अपमान करता., साहित्यिकांना दलाल म्हणता, ज्यांनी एकेकाळी तुम्हाला मुख्यमंत्री केलं त्यांचाही अपमान करता. काही जनाची नाही तर मनाची तरी ठेवा. माझ्यावर कितीही आरोप करा. कितीही शिव्या द्या. माझ्या मागे लाडक्या बहिणी, लाडके भाऊ आणि लाडके शेतकरी आहेत, तोपर्यंत मला चिंता नाही. मी कुणाला घाबरत नाही असाही टोला शिंदे यांनी लागवला.
.