क्लासवरुन घरी आला, खोलीत भावाला त्या अवस्थेत पाहून बहिणीचा हंबरडा; बारावीच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

Sangli News : सांगलीत एका बारावीच्या विद्यार्थ्याने परीक्षेआधीच आयुष्य संपल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

Lipi

स्वप्निल एरंडोलीकर, सांगली : सांगलीतील मिरजमध्ये बारावीच्या विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश बाळासाहेब बिराजदार (१८ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. संबंधित विद्यार्थी हा बारावीमध्ये शिकत होता. ११ फेब्रुवारी २०२५, आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली आहे. पण याआधीच, परीक्षा सुरू होण्याआधीच प्रथमेश बिराजदार याने सोमवारी रात्री आठ वाजता राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. लेकाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
लाडकी बहीण योजनेत ५ लाख अपात्र महिलांना दिले ४५००००००००० रुपये, सरकार परत घेणार रक्कम?
प्रथमेशच्या आत्महत्येचे नेमके कारण समोर आले नाही. मात्र त्याने परीक्षेच्या कारणामुळे, परीक्षेच्या तणावातून आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. प्रथमेश बिराजदार हा हुशार विद्यार्थी होता, अशी माहिती परिसरातील लोकांकडून समजते आहे. मात्र हुशार विद्यार्थी असूनही परीक्षा सुरू होण्यापूर्वीच त्याने आत्महत्या केल्याने मिरजमध्ये खळबळ उडाली आहे. या घटनेने परिसरातील नागरिकांमधून मात्र हळहळ व्यक्त होत आहे.
तोरणा किल्ला चढताना मंदिराजवळ थांबले, काही क्षणात मृत्यूने गाठले, पुण्यातील पर्यटकाचा हृदयद्रावक अंत

क्लासवरुन घरी आला, खोलीत भावाला त्या अवस्थेत पाहून बहिणीचा हंबरडा; बारावीच्या विद्यार्थ्याने संपवलं आयुष्य

सोमवारी रात्री काय घडलं?

प्रथमेश सोमवारी रात्री खाजगी अकॅडमीमधून मंगळवारचा, उद्याचा पेपर कसा सोडवायचा याचे लेक्चर घेऊन आला होता. त्यानंतर सोमवारी संध्याकाळी त्याच्या बहिणीसोबत गप्पा – गोष्टी करून तो पुन्हा अभ्यास करण्यासाठी दुसऱ्या खोलीमध्ये गेला होता. त्यानंतर रात्री नऊच्या सुमारास जेवण करण्यासाठी त्याची बहीण त्याला बोलवण्यासाठी त्याच्या खोलीकडे आली. त्यावेळी प्रथमेश गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. प्रथमेशने आत्महत्या केल्याचं समोर आलं. भावाला अशा लटकलेल्या अवस्थेत पाहिल्यानंतर बहिणीने एकच आक्रोश केला. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

करिश्मा भुर्के

लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.आणखी वाचा

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)