Vidur Niti: महाभारत महाकाव्य युद्ध आणि महारथी योद्धासंदर्भात माहिती आहे. यामध्ये भगवंत श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला भगवद्गगीता सांगितली. या महाभारतातील विदुर प्रभावशाली पात्र आहे. राजा धुतराष्ट्र यांचा भाऊ आणि मंत्री असलेले विदुर यांनी नेहमी त्यांना सडेतोड सल्ले दिले होते. ते ज्ञानी, नीतीज्ञ आणि धर्मज्ञ होते. त्यांच्या नीती महाभारत काळात नाही आजही प्रासंगिक आहेत. जीवनातील अनेक पैलूंमध्ये महत्वा विदुर यांच्या नीती मार्गदर्शक ठरत असतात. त्यांची नीती धर्म, राजकारण, समाज आणि परिवारासंदर्भात आहे. जीवन संतुलित, सुखमय आणि समृद्ध बनवण्यासाठी त्यांची नीती फायदेशीर आहे. त्या नितीप्रमाणे काम करणाऱ्यांचे जीवन योग्य दिशेला जावू शकते.
काम अर्धवट सोडू नका…
विदुर नीतीनुसार, कोणतेही काम सुरु करण्यापूर्वी निश्चय करणारा व्यक्ती बुद्धिमान सिद्ध होतो. हा व्यक्ती हातात घेतलेले कोणतेही काम अपूर्ण ठेवत नाही. तसेच मोल्यवान वेळ कधी व्यर्थ घालवत नाही. या व्यक्तीचे स्वत:च्या मनावर नेहमी नियंत्रण असते.
कोणाची कमतरता काढत नाही
महात्मा विदुर म्हणतात, जे व्यक्ती चांगले काम करत असतील त्यांच्या कामात असे व्यक्ती कधी उणेदुणे काढत नाही. ते नेहमी प्रगती आणि विकास प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत असतात. या प्रमाणे वागणारे व्यक्ती बुद्धिमान आणि श्रेष्ठ समजले जातात.
भारत 1, ब्राझील 2…,अमेरिका अन् चीन जवळपाससुद्धा नाही, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा असा हा अहवाल

बहिणीच्या लग्नात 22 वर्षीय युवतीचा 3 मिनिटे जबरदस्त डान्स, नंतर स्टेजवर ह्रदयविकाराचा झटका, व्हिडिओ आला समोर

बांगलादेशात ISI चा गेम प्लॅन, 1971 च्या पराभवाच्या बदला घेण्याची तयारी, जिहादीसोबत मिळून कट

50 हजारांचे एक कोटी करणारा हा शेअर, 10 वर्षांत 22,100 टक्के रिटर्न, कधी किंमत होती 2 रुपये
ही लोक असतात ज्ञानी
महात्मा विदुर यांनी कोणत्या प्रकारची लोक ज्ञानी असतात, त्यासंदर्भातही सांगितले आहे. ज्या व्यक्तीकडे ज्ञान आहे, त्यांच्याकडे सर्व प्रकारच्या सुखसुविधा आहेत, त्याला कोणत्याही प्रकारचे गर्व नाही, त्याला अभिमान वाटत नाही, तो सदैव नम्र असतो, असे व्यक्ती महाज्ञानी सिद्ध होतात. या प्रकारातील व्यक्तींना बुद्धिमान म्हटले जाते.
हे लोक ठरतात मुर्ख
महात्मा विदुर म्हणतात, जो व्यक्ती दरिद्राचे प्रदर्शन करतो, त्यांच्याकडे कोणतेही ज्ञान नसतान त्याला गर्व होतो, कोणतेही काम न करता त्याला धन मिळण्याची अपेक्षा असते, या प्रकारातील व्यक्ती मुर्ख असतात.
Disclaimer: हा लेख सामान्य माहिती आणि गृहितकांवर आधारित आहे. यामधील तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.