कधी आहे महाशिवरात्र? जाणून घ्या महाशिवरात्रीचामुहूर्त आणि तिथी

महाशिवरात्रीचे व्रत हे महादेवाला समर्पित आहे. या दिवशी महादेव आणि पार्वतीचा विवाह झाला असे मानले जाते. हा त्यांच्या लग्नाचा उत्सव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची पूजा आणि अभिषेक करणे शुभ मानले जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी महादेव आणि माता पार्वतीची पूजा केल्याने व्यक्तीचे सर्व दुःख दूर होतात. यामुळे जीवनात सुख समृद्धी येथे.

कधी आहे महाशिवरात्र?

फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही बुधवारी 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.08 मिनिटांनी सुरू होईल आणि 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 8:54 मिनिटांनी संपेल. महाशिवरात्रीची पूजा रात्री केली जाते त्यामुळे महाशिवरात्रीचा उपवासही 26 फेब्रुवारीला केला जाणार आहे.

महाशिवरात्रीच्या पूजेचा मुहूर्त

महाशिवरात्रीच्या दिवशी निशिता काळात पूजेचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी निशिता काळाची सुरुवात 26 फेब्रुवारीला दुपारी 12:09 ते 12:59 पर्यंत आहे. त्यामुळे भाविकांना पूजेसाठी फक्त 50 मिनिटांचा वेळ मिळणार आहे.

रात्री पूजा करण्याचे चार मुहूर्त

रात्रीच्या पहिल्या प्रहर पूजेची वेळ – संध्याकाळी 6:19 ते 9:26 पर्यंत असेल.

रात्रीच्या दुसऱ्या प्रहर पूजेची वेळ – 26 फेब्रुवारी रोजी सकाळी 9: 9 ते 27 फेब्रुवारी रोजी 12:34 पर्यंत.

रात्रीच्या तिसऱ्या प्रहर पूजेची वेळ- 27 फेब्रुवारी रोजी दुपारी 12:34 ते 3:41 पर्यंत असेल.

रात्रीच्या चौथ्या प्रहर पूजेची वेळ- 27 फेब्रुवारी सकाळी 3:41 ते 6:48 पर्यंत असेल.

महाशिवरात्रीच्या पारणाची वेळ

महाशिवरात्रीच्या व्रताच्या पारण्याचा शुभमुहूर्त गुरुवारी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:48 ते 8:534 पर्यंत असेल. या वेळेमध्ये उपवास करणारे भक्त महादेवाची पूजा करून उपवास सोडू शकतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)