काय आहे प्रकरण?
या प्रकरणी तरुणाच्या भावाने २१ मे रोजी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुरजकुमार (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) याच्यासह सहा मोबाइलधारकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांच्या भावाला व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्यांचा फोटो अश्लील पद्धतीने ‘मॉर्फ’ केला. हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याच्याकडे ५१ लाख रुपयांची मागणी केली.
बदनामी होऊ नये, यासाठी फिर्यादीच्या भावाने आरोपींना दहा हजार रुपये ऑनलाइन पाठवले. मात्र, त्यानंतरही आरोपींनी फिर्यादीच्या भावाला वारंवार फोन करून पैशांची मागणी केली आणि मानसिक त्रास दिला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून; तसेच बदनामीच्या भीतीने फिर्यादीच्या भावाने राहत्या घरात पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन स्वतःचे जीवन संपवले. दिघी पोलिस तपास करीत आहेत.