केजरीवाल गड राखणार की भाजप सुरुंग लावणार? दिल्ली विधानसभा निकालाचं काउंटडाऊन सुरू, इथे पाहा प्रत्येक अपडेट

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दिल्लीमध्ये कोण बाजी मारणार? अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा आपला गड राखणार की भाजप आपच्या या अभेद्य गडाला सुंरुग लावणार हे आता पुढच्या काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे. यावेळची दिल्ली विधानसभा निवडणूक वेगवेगळ्या कारणानं चांगलीच चर्चेत राहिली. दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्यापूर्वी भाजपनं यावेळी चांगलीच तयारी केल्याचं पाहायला मिळालं. काँग्रेस आणि भाजपकडून आम आदमी पार्टीला घेरण्याचा प्रयत्न करण्यात आला. तर आपकडून देखील तोडीस तोड प्रत्युत्तर देण्यात आलं. त्यामुळे प्रचारात चांगलीच रंगत आही. त्यामुळे यावेळी दिल्लीत कोणाची सत्ता येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

मात्र दुसरीकडे एक्झिट पोलची आकडेवारी पाहिल्यास यावेळी दिल्लीमध्ये आपच्या गडाला भाजप सुरुंग लावण्याची शक्यात आहे. दिल्लीमध्ये भाजपचा विजय होऊ शकतो असा अंदाज आहे. आप दुसऱ्या नंबरवर राहण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला दिल्ली विधानसभा निवडणुकीत फारस यश मिळताना दिसत नाहीये. त्यामुळे तब्बल 25 वर्षांनंतर पुन्हा एकदा दिल्लीमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता आहे.

काय सांगते एक्झिट पोलची आकडेवारी? 

एक्झिट पोलच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास दिल्लीमध्ये यावेळी भाजपला सत्ता मिळण्याची शक्यता आहे.  चाणक्यने वर्तवलेल्या अंदाजानुसार दिल्लीमध्ये सत्ताधारी आपला 25 ते 28 इतक्या जागा मिळण्याची शक्यता आहे. तर भाजपला 39 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसच्या वाट्याला केवळ दोन ते तीन जागाच येऊ शकतात असा अंदाज आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपला 45 ते 50 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 25 ते 30 जागांवरच समाधान मानावं लागणार आहे. काँग्रेसच्या वाट्याला केवळ 2 जागा जाण्याची शक्यात आहे.

डीव्ही रिसर्च करून जारी करण्यात आलेल्या एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजप सत्तेत येताना दिसत आहे, दिल्लीमध्ये भाजपला  40 ते 44 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर आपला 25 ते 29 जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर काँग्रेस केवळ एक जागा येणार असल्याचा अंदाज आहे.

दरम्यान सर्व एक्झिट पोलनुसार दिल्लीमध्ये भाजपची सत्ता येताना दिसत आहे, आपला मोठा धक्का बसू शकतो. तर काँग्रेसची जोरदार पिछेहाट होण्याचा अंदाज आहे. भाजप तब्बल 25 वर्षांनी पुन्हा एकदा सत्तेत येऊ शकते. तुम्ही टीव्ही 9 वृत्त वाहिनीवर निकालाबाबत प्रत्येक क्षणाक्षणाची अपडेट मिळू शकतात. टीव्ही 9 चं वेब पोर्टल तसेच युट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला निकालाची प्रत्येक अपडेट मिळणार आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)