- पहिल्या फेरीत सुप्रिया सुळे ६ हजार ९४१ मतांनी आघाडीवर
- सुप्रिया सुळे दुसऱ्या फेरीअखेर ११ हजार ५३२ हजार मतांनी आघाडीवर
उमेदवार | पक्ष | जय/पराजय |
सुप्रिया सुळे | राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) | |
सुनेत्रा पवार | राष्ट्रवादी (अजित पवार) | |
महेश भागवत | ओबीसी बहुजन पक्ष |
मतदार संघांमधील सहा विधानसभा मतदार संघांपैकी बारामती विधानसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांच्याविषयी सहानुभूतीचे वातावरण होते. भोरमधून आमदार संग्राम थोपटे यांच्यामुळे सुळे यांना साथ मिळेल, असे चित्र राहिले. दौंडमधील आमदार राहुल कुल, पुरंदरचे माजी आमदार विजय शिवतारे आणि इंदापूरचे माजी आमदार हर्षवर्धन पाटील या अजित पवार यांच्या यांच्या आतापर्यंतच्या कट्टर राजकीय विरोधकांनी त्यांच्याशी हातमिळवणी केली. मात्र, त्यांच्याकडून दिलेला शब्द पाळला जाणार का, मागील निवडणुकांचे उट्टे काढले जाणार, याबाबत संभ्रमावस्था आहे. त्यामुळे सुळे आणि सुनेत्रा पवार या दोन्ही उमेदवारांना या तीन मतदार संघांतून प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अशा परिस्थितीत खडकवासला विधानसभा मतदार संघ हा निकालाबाबतीत निर्णायक भूमिकेत असणार आहे.
‘खडकवासल्या’कडे दोन्ही पक्षांचे लक्ष
खडकवासला विधानसभा मतदारसंघात शहरी मतदारांची संख्या जास्त आहे. एकेकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व राहिलेल्या या मतदार संघात मागील तीन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपचे भीमराव तापकीर हे विजयी झाले आहेत. त्यामुळे भाजपची ताकद आहे. तसेच मागील दोन लोकसभा निवडणुकांमध्ये सुळे यांना कमी मते मिळाली आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीने या मतदार संघावर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. या ठिकाणी शरद पवार, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सभा घेऊन वातावरण ढवळून काढले. त्यामुळे खडकवासल्यातील मतदार कोणाच्या बाजूने झुकणार, यावर या मतदार संघातील निकाल अवलंबून आहे.
अजितदादांचे ३ नवे मित्रांकडे सगळ्यांचे लक्ष
पुणे जिल्ह्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादी वाढविताना अनेकांशी राजकीय वैर पत्करले. त्यामध्ये शिवतारे, हर्षवर्धन पाटील आणि राहुल कुल हे तीनजण आहेत. आता हे तिघेही अजित पवार यांचे नवे मित्र बनले आहेत. राजकीय क्षेत्रात उड्डाण घेताना या तिघांचेही पंख छाटण्याचे काम अजित पवार यांनी वेळोवेळी केले आहे. मात्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिष्टाई कामाला आल्याने ते आता चांगले मित्र झाले आहेत. मात्र, पूर्वानुभवामुळे कलुषित झालेली मने गुप्तपणे कोणती भूमिका घेणार, यावर सुनेत्रा पवार यांचे भवितव्य अवलंबून असणार आहे.
कौटुंबिक कलह आणि मतदार अस्वस्थ बारामती तालुक्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, विकासकामे आणि त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांना मिळालेला रोजगार यामुळे अनेक लाभार्थ्यांनी अजित पवार यांना प्रचारात उघडपणे पाठिंबा दिला.जुनेजाणते मतदार हे सुळे यांना साथ देत आहेत. मात्र, नवीन फळी ही अजित पवार यांच्या सोबत असल्याने सुनेत्रा पवार यांच्या सभांना गर्दी दिसली. मात्र, या गर्दीचे रुपांतर मतांमध्ये करण्याचे आव्हान अजित पवारांपुढे होते.
बारामतीत पक्षीय बलाबल कसे?
पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर , भोर आणि खडकवासला हे विधानसभा मतदारसंघ येतात. सध्या इंदापूरमध्ये अजित पवार गटाचे दत्तामामा भरणे, दौंडमध्ये आमदार राहुल कुल, बारामतीमध्ये अजित पवार तर पुणे शहरातील खडकवासला या मतदारसंघाचे भीमराव तापकीर विद्यमान आमदार सत्ताधारी पक्षात आहेत.