राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश कार्यालयाच्या बाहेर सुनेत्रा पवार यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. बॅनरच्या माध्यमातून मतदारांचे आणि बारामतीकरांचे आभार मानण्यात आले आहेत. मंत्रालयासमोर हे बॅनर लावल्याची माहिती आहे.
निकाला पूर्वीच सुनेत्रा पवार यांच्या विजयाची बॅनरबाजी मुंबईमध्ये झाल्याने सगळ्यांचे लक्ष वेधले गेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी बबनराव मदने आणि प्रतापराव बंडकर यांच्या माध्यमातून बॅनरबाजी करण्यात आली आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
दरम्यान, अजितदादा सोडून गेल्याने मिळत असलेली सहानुभूती, आतापर्यंतचा राजकीय अनुभव, कोणत्या विरोधकाने कोणता डाव टाकल्यास त्याला कसे चितपट करावे याचे ज्ञान ही शरद पवार यांची जमेची बाजू. त्याच्याकडे प्रचारासाठी कार्यकर्त्यांची फौज फारशी दिसत नसली, तरी जनतेतून स्वतःहून कार्यकर्ते समोर येऊन नवे चिन्ह घरोघरी पोहोचवित आहेत. संपूर्ण कुटुंबाची ताकदही मागे उभी राहिली हा संदेशही जनतेपर्यंत पोहोचविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यामुळे जनतेच्या विशेषतः ज्येष्ठ मंडळींसह काही प्रमाणात तरुणांच्या मनात पवार यांच्या विषयीची सहानुभूती दिसत आहे. नेहमीच्या पद्धतीने शेवटच्या सभेत काय संदेश देतील, त्यावरच सहानुभूती वाढणार की घटणार हे अवलंबून असेल.