Chandrahar Patil on Shivraj Rakshe : मी देखील २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो आहे. त्यावेळी मी तर आत्महत्या करण्याच्याच विचारात होतो, असं चंद्रहार पाटील म्हणाले
Maharashtra Kesari : शिवराजने पंचांना लाथ काय, गोळ्या घालायला हव्या होत्या; ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटलांचा संताप
मी देखील २००९ साली ट्रिपल महाराष्ट्र केसरीची कुस्ती स्पर्धा खेळताना या वादग्रस्त निर्णयाला बळी पडलो आहे. त्यावेळी मी तर आत्महत्या करण्याच्याच विचारात होतो, असं चंद्रहार पाटील म्हणाले. पृथ्वीराज मोहोळचे मी अभिनंदन करतो, त्यात पृथ्वीराजची काही चूक नाही, मात्र पंचांचा निर्णय वादग्रस्त आहे, असं चंद्रहार पाटील म्हणाले.
पुण्याच्या पृथ्वीराजने नाव कोरलं
पुण्याचा नवोदित युवा मल्ल पृथ्वीराज राजेंद्र मोहोळ याने अत्यंत चुरशीच्या लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाड याचा २-१ अशा गुण फरकाने पराभव करून ‘महाराष्ट्र केसरी’ किताब पटकावला आणि प्रतिष्ठेच्या चांदीच्या गदेवर आपले नाव कोरले. मात्र पृथ्वीराज मोहोळ आणि शिवराज राक्षे यांच्यातील अंतिम लढतीत प्रचंड गोंधळ निर्माण झाला.
Maharashtra Kesari 2025: पंचांना का लाथ घातली? शिवराज राक्षेने सांगितलं तिथं नेमकं काय घडलं? मला खालून…
कशावरुन गोंधळ झाला?
पृथ्वीराजने शिवराजला चितपट केले. मात्र, त्याला हा निर्णय मान्य नव्हता. शिवराजच्या मते त्याची पाठ पूर्णपणे टेकलेली नव्हती. यामुळे पंचांच्या निर्णयावर शिवराजसह त्याचे प्रशिक्षक, हितचिंतकांनी आक्षेप घेऊन निर्णयाविरोधात तांत्रिक समितीकडे अपिल केले.डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेला लाथ मारणं महागात, महेंद्र गायकवाडसह दोघांवर मोठी कारवाई
पंचांना लाथ घातल्याने वाद
नियमानुसार कुस्ती चितपट झाल्यास त्या निर्णयावरील अपिल स्वीकारले जात नाही. यामुळे या लढतीत पृथ्वीराज मोहोळ विजेता ठरला. या वेळी राक्षे पंचांवर प्रचंड चिडला होता. त्याने एका पंचांना थेट लाथच मारली. त्यामुळे स्पर्धा काही काळ थांबली होती. याबाबत राक्षेला तीन वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे.
शिवराज राक्षे ‘डबल महाराष्ट्र केसरी’ आहे. त्याचबरोबर अंतिम लढतीच्या निकालानंतर पुन्हा एकदा महेंद्र गायकवाड आणि त्याच्या हितचिंतकांनी गोंधळ घातला. पोलिसांनी लाठीचार्ज करून त्यांना मैदानातून बाहेर काढले. महेंद्र गायकवाडवरही तीन वर्षांची बंदी घालण्यात आल्याचे समजते.