Accident News : नाशिक-गुजरात हायवेवर खाजगी बसचा भीषण अपघात, बस 200 फूट खोल दरीत कोसळली

नाशिक-गुजरात हायवेवर सापुतारा घाटात खाजगी लक्झरी बसचा भीषण अपघात झाला आहे. बस 200 फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात 7 जण जागीच ठार झाले, तर 15 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. अपघात इतका भीषण की. बसचे घाटात कोसळल्यानंतर दोन तुकडे झाले. नाशिकहून देवदर्शन करून गुजरातकडे देवदर्शनासाठी जात असताना हा अपघात झाला. अपघात झालेल्या बस मधील सर्व मयत आणि जखमी प्रवासी मध्य प्रदेश मधील आहेत.

(बातमी अपडेट होत आहे)

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)