निर्मला सीतारमण यांच्या साडीची चर्चा
भारताच्या विकासाच्या दृष्टीने आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण त्यांच्या साड्यांमुळे नेहमीच चर्चेचा विषय ठरत आलेल्या आहेत. याआधीही अर्थसंकल्पादरम्यान अर्थमंत्र्यांनी वेगवेगळ्या विशिष्ट राज्याच्या पारंपरिक साड्या परिधान करून अर्थसंकल्प सादर केला आहे. सीतारमण यांचे साडी कलेक्शन महिलांना खूप आवडते. दरम्यान अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्पाची कागदपत्रे घेऊन संसद भवनात पोहचल्या तेव्हा त्यांच्या साडीचीही जोरदार चर्चा सुरु होती. यंदा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी खास साडी नेसली , ज्यामध्ये काही खास कलाकृतीही दिसत होती. चला जाणून घेऊयात या खास साडीबद्दल
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या साड्यांच्या कलेक्शनमुळे चर्चेत येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ नाही. यापूर्वी त्यांनी सात वेळा अर्थसंकल्प सादर केला असून प्रत्येकवेळी त्यांनी पारंपारिक साड्या परिधान केल्यामुळे चर्चेचा विषय ठरल्या आहेत. गेल्या वर्षी अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्र्यांनी निळ्या रंगाची हातमागाची साडी अतिशय सुरेख पद्धतीने परिधान केली होती.
पांढरी साडी, सोनेरी बॉर्डर असलेली निर्मला सीतारमण यांची साडी खास
पुन्हा एकदा अर्थमंत्री त्यांच्या पारंपारिक लूकमुळे चर्चेचा विषय बनल्या आहेत. खरं तर केंद्रीय अर्थसंकल्प 2025 साठी निर्मला सीतारमण यांनी लाल कॉन्ट्रास्ट ब्लाउजसोबत सोनेरी बॉर्डर असलेली आणि क्रीम रंगाची साडी नेसली होती.
2021 मध्ये पद्मश्रीने सन्मानित दुलारी देवी यांनी मिथिला आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये एका कार्यक्रमादरम्यान अर्थमंत्र्यांची भेट घेतली. त्यांच्या भेटीदरम्यान, त्यांनी बिहारमधील मधुबनी कलेच्या समृद्ध परंपरेबद्दल संभाषण केले होते. त्यावेळी दुलारी देवी यांनी सीतारमण यांना ही खास साडी भेट दिली आणि अर्थसंकल्पाच्या दिवशी ती परिधान करण्याची विनंती केली होती.
गेल्या 5 अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांची साडी चर्चेत
– 2024-25 च्या अर्थसंकल्पात निर्मला सीतारमण यांनी आंध्र प्रदेशची मंगलगिरी साडी नेसली होती. राज्यातील गुंटूर जिल्ह्यातील ही पारंपरिक साडी आहे.
– 2024 च्या अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारामन यांनी पश्चिम बंगालच्या निळ्या कांथापासून विणलेली साडी नेसली होती.
– अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प 2023 मध्ये लाल रंगाची सिल्क साडी परिधान केली होती, ज्यावर काळ्या आणि सोन्याच्या बॉर्डर असलेली साडी नेसली होती. या साडीमध्ये रथ, मोर आणि लोटसचे सुंदर डिझाईन होते.
– अर्थसंकल्प 2022 मध्ये सीतारमण यांनी ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातील बोमकाई गावाशी संबंधित असलेली साडी नेसली होती. ऑफ व्हाईट बॉर्डर असलेल्या तपकिरी रंगाच्या साडीत त्या सुंदर दिसत होत्या.
– केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २०२१ चा अर्थसंकल्प सादर करण्यासाठी लाल आणि पांढऱ्या रंगाची पोचमपल्ली साडी परिधान केली होती, जी हैदराबादमधील पोचमपल्ली गावाशी संबंधित आहे.