Sangli Lok Sabha Election Result 2024: सांगलीची पाटीलकी कोणाला मिळणार, संजयकाका विरुद्ध विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील

आज लोकसभा निवडणूक २०२४चे निकाल जाहीर होत आहेत. महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघातील सांगली हा एक मतदारसंघ आहे. सांगली मतदारसंघातून कोणाचा विजय होणार याचे क्षणा क्षणाचे अपडेट या पेजवर तुम्हाला मिळतील. महाविकास आघाडीतील जागा वाटपात सर्वाधिक चर्चेत राहिलेला सांगली मतदारसंघ होय. सांगलीत यावेळी ६०.९५ टक्के मतदान झाले.
उमेदवार पक्ष विजय/पराभव
चंद्रहार पाटील शिवसेना उद्धव ठाकरे गट
संजयकाका पाटील भाजप
विशाल पाटील अपक्ष
महेश यशवंत खराडे सपा
टिपू सुलतान सिकंदर पटवेगर बसपा

सांगली लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या विधानसभा मतदारसंघात झालेले मतदान

मिरज- ५९ टक्के
सांगली- ५७.५०
तासगाव-कवठेमहाकाळ- ६१.१६
जत- ५९.३२
खानापूर- ५१.११
पलूस-कडेगाव- ५६.४५

महाविकास आघाडीतील कोणत्या पक्षाने ही जाग लढवायची यावरून बराच गोंधळ झाला. शिवसेना उद्धव ठाकरे गटाने जागा वाटपाचे सूत्र जाहीर होण्याआधी येथून चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. यावर काँग्रेस नेत्यांनी इतकच नाही तर शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली. अखेर काँग्रेसमधून लोकसभेसाठी तयारी करणाऱ्या विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सांगलीमध्ये यावेळी तिहेरी लढत होताना दिसते. विशाल पाटील यांनी २०१९ मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून निवडणूक लढवली होती. तेव्हा देखील संजयकाका पाटील विरुद्ध गोपीचंद पडळकर आणि विशाल पाटील अशी तिहेरी लढत पहायला मिळाली होती.

सांगली लोकसभा मतदारसंघ फार चर्चेत नव्हता. मात्र शिवसेनेने केलेली कुरघोडी आणि त्यानंतर काँग्रेसचे बंडखोर विशाल पाटील यामुळे या मतदारसंघातील निकालावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहता हा काँग्रेसचा गड मानला जातो. काँग्रेसचा हा गड कोसळला तो २०१४च्या मोदी लाटेत, तेव्हा संजयकाका पाटील यांनी विजय मिळवला आणि हा मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आला. २०२९ मध्ये संजयकाका यांनी पुन्हा एकदा बाजी मारली. आता यावेळी त्यांची हॅटट्रिक होते की शिवसेनेचा भगवा फडकतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.