मुंबई- कोकण (१२)
भाजप उमेदवार – पालघर, भिवंडी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, रत्नागिरी-सिंघदुर्ग
उद्धव ठाकरे (शिवसेना) – पालघर,कल्याण,ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग
एकनाथ शिंदे (शिवसेना) – कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर पश्चिम,मुंबई दक्षिण, मुंबई दक्षिण मध्य
काँग्रेस – मुंबई उत्तर, मुंबई उत्तर मध्य
राष्ट्रवादी काँग्रेस (पवार गट) – भिवंडी
ठाकरे आणि शिंदे आमने सामने
मुंबई आणि कोकण विभागात उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्यात ५ ठिकाणी थेट लढत आहे. यात कल्याण, ठाणे, उत्तर पश्चिम मुंबई, मुंबई दक्षिण मध्य,मुंबई दक्षिण, या मतदार संघांचा समावेश आहे. यात कल्याण मधून एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे वि. वैशाली दरेकर अशी लढत होणार आहे. तर ठाण्यात ठाकरेंचे खंदे समर्थक राजन विचारे आणि शिंदे गटाचे नरेश म्हस्के यांच्यात होणार आहे. उत्तर पश्चिम मतदार संघातून ठाकरेंच्या जवळचे पण आता शिंदे गटात गेलेले रविंद्र वायकर आणि ज्यांचे वडिल शिंदे गटात आहेत पण ठाकरे गटात राहिलेले अमोल कीर्तिकर यांच्यात होणार आहे. दक्षिण मुंबईत दोन वेळचे खासदार अरविंद सावंत यांच्यासमोर शिंदे गटाच्या भायखळ्यातील आमदार यामिनी जाधव उभ्या ठाकल्या आहेत.
मुंबई – कोकण विभागातील १२ मतदार संघाची अधिक माहिती
- रायगड
- रत्नागिरी – सिंधुदुर्ग