मुंढवा, कोरेगाव पार्क आणि बंडगार्डन भागातील ताडीगुत्ता चौक, एबीसी फार्म चौक, केपी जंक्शन, महात्मा गांधी जंक्शन, ब्लू डायमंड चौक, मोबोज चौक, जहाँगीर चौक, कौन्सिल हॉल चौक, नॉर्थ मेन रस्ता, बंडगार्डन रस्ता, कोरेगाव पार्क रस्ता भागात सकाळी सहा ते सायंकाळी पाच दरम्यान वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
असा असेल वाहतूक बदल
वाहतुकीची परिस्थिती लक्षात घेता चार जून रोजी पहाटे पाच पासून ब्लू डायमंड चौक ते सर्किट हाऊस दरम्यान हलक्या वाहनांची एकेरी वाहतूक सोडली जाईल.
साऊथ मेन रस्ता चारजूनच्या मध्यरात्री बारा ते सायंकाळी पाच दरम्यान वाहतुकीसाठी बंद. नागरिकांनी नॉर्थ मेन रस्त्याच्या अंतर्गत रस्त्याचा वापर करावा.
लेन क्रमांक दोन, तीन व चार आवश्यकेतनुसार बंद राहतील.
पार्किंगसाठी ठिकाणे
पुज्य कस्तुरबा गांधी शाळा नॉर्थ मेन रस्ता कोरेगाव पार्क (प्रशासकीय कर्मचारी अधिकारी)
रोही व्हिला लॉन्स लेन क्रमांक सात कोरेगाव पार्क (नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी)
दपुना स्कूल ऍन्ड होम फॉर द ब्लाईड ट्रस्ट, नॉर्थ मेन रस्ता (प्रशासकीय कर्मचारी व नागरिक)