लिंबे महाग; कलिंगड स्वस्त
फळबाजारात लिंबांच्या दरांत वाढ झाली असून, कलिंगडाच्या दरात घट झाली आहे. खरबूज, पपई, चिकू, डाळिंब, संत्री आणि मोसंबीचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
फळांचे दर पुढीलप्रमाणे (रुपयांत) – लिंबे (प्रतिगोणी) : ३००-१५००, मोसंबी : (तीन डझन): २३०-३५०, (चार डझन) : १००-२१०, संत्री : (१० किलो) : २००-८००, डाळिंब (प्रतिकिलो) : भगवा : ४०-१३०, आरक्त : १०-४०, गणेश : ५-२५, कलिंगड : ७-१०, खरबूज : १२-१८, पपई : ५-११, चिकू (दहा किलो) : १००-६००, अननस (एक डझन) १००-६०० रुपये.
फुलांचे भाव स्थिर
उन्हामुळे फुलबाजारात फुलांची आवक साधारण होत आहे. मागणी आणि आवक सारखीच असल्याने फुलांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़ फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे (रुपयांत) – झेंडू : २०-७०, गुलछडी : ८०-१२०, अॅस्टर : जुडी २०-४०, सुट्टा १००-१५०, शेवंती : ८०-१३०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : २०-३०, गुलछडी काडी : ३०-८०, डच गुलाब (२० नग) : ३०-८०, जर्बेरा : १०-३०, कार्नेशियन : ८०-१२०, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-९००, ऑर्किड ३००-५००, जिप्सोफिला : ५०-८०, मोगरा : २५०-३०० रुपये.
मासळीचे दर तेजीत
गणेश पेठ येथील बाजारात मासळीची आवक कमी होत असताना मागणी वाढल्याने मासळीचे दर तेजीत असल्याची माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी दिली. चिकन, मटण आणि गावरान अंड्यांचे दर स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. खोल समुद्रातील मासळी आठ ते १० टन, खाडीच्या मासळीची २०० ते ३०० किलो आणि नदीच्या मासळीची ७०० ते ८०० आवक झाली. आंध्र प्रदेशातून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन आवक झाली, अशी माहिती मासळीचे व्यापारी ठाकूर परदेशी, चिकन-अंड्यांचे व्यापारी रूपेश परदेशी आणि मटणाचे विक्रेते प्रभाकर कांबळे यांनी दिली. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना हवीहवीशी वाटणारी काळी मैना; अर्थात करवंदे शहरात दाखल झाली असून, खरेदीसाठी मोठी गर्दी होत आहे.