या गोष्टींनी अविस्मरणीय बनवा यावर्षीचा प्रजासत्ताक दिन, राष्ट्रगीताने करा दिवसाची सुरुवात

प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण आहे जो प्रत्येक देशवासी अभिमानाने साजरा करतो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली त्यानंतर दरवर्षी देशाच्या लोकशाहीचा विशेष प्रसंग म्हणून हा दिवस साजरा केला जातो. देशातील नागरिकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव व्हावी या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्त शाळा, महाविद्यालय येथे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. या दिवशी शाळा, महाविद्यालय तसेच इतर सर्व कार्यालयांना सुट्टी देण्यात येते. परंतु प्रजासत्ताक दिन हा सुट्टीचा दिवस नसून आपला देश आणि त्याची महानता लक्षात ठेवण्याचा दिवस आहे. हा दिवस अविस्मरणीय बनवण्यासाठी तुम्ही तुमचे कुटुंबीय आणि मित्रांसोबत हा दिवस खास पद्धतीने साजरा करू शकता.

तिरंग्याच्या रंगांनी घर सजवा

जर तुम्ही घरी प्रजासत्ताक दिन साजरा करत असाल तर तुम्ही सजावटी पासून सुरुवात करू शकता. तुम्ही तुमचे घर तिरंगाच्या रंगाने सजवू शकता. यासाठी फुगे, झेंडे किंवा फुलांचा वापर करा. त्यासोबतच तुम्ही तुमच्या परिसरात ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करू शकता.

राष्ट्रगीताने करा दिवसाची सुरुवात

सकाळी तुमच्या पूर्ण कुटुंबासह तिरंगा ध्वज फडकवा. ध्वजारोहण केल्यानंतर राष्ट्रगीत गाऊन देशभक्तीचा अनुभव घ्या. यासोबतच देशभक्तीपर गीते, कविता हे देखील तुम्ही ऐकू शकता.

परेड आणि सांस्कृतिक कार्यक्रम पहा

जर तुम्ही घरी असाल तर टीव्हीवर नवी दिल्लीतील कर्तव्य पथवर होणारी प्रजासत्ताक दिनाची परेड पहा. चित्ररथाच्या माध्यमातून देशाची सांस्कृतिक विविधता समजून घ्या आणि मुलांना चित्ररथ आणि परडचे महत्त्व समजून सांगा.

देशभक्तीपर गाणे आणि चित्रपट पहा

बॉर्डर, लक्ष, स्वदेश, रंग दे बसंती किंवा चक दे इंडिया यासारखे देशभक्तीपर चित्रपटे पहा. वंदे मातरम, मेरा रंग दे बसंती चोला इत्यादी देशभक्तीपर गाणे ऐका.

तिरंगी पदार्थ बनवा

भारतातील कोणताही सण हा स्वादिष्ट जेवणाशिवाय अपूर्णच असतो. त्यामुळे प्रजासत्ताक दिनानिमित्त खास तिरंग्याच्या रंगाचे पदार्थ तयार करा. जसे की तिरंगा सँडविच, तिरंगा पुलाव, हलवा, यासारखे पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)