घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी नांदावी म्हणून वास्तू खूप महत्त्वाची भूमिका बजावते. तुमच्या घराची वास्तू खराब असेल तर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. घरामध्ये वास्तूच्या नियमांचे पालन केल्यामुळे तुमच्या घरामध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता वाढते. वासूचे नियम पाळल्यामुळे तुमच्यामध्ये सकारात्मक ऊर्जा मिळते. मात्र अनेकजण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतात ज्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येतात आणि घरामध्ये नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. घरामध्ये शंख ठेवण्याबाबद वासूमध्ये काही नियम सांगितले आहेत.
घरामध्ये वास्तूच्या नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरातील वातावरण चांगले राहाते. घरामध्ये शंख ठेवणे वास्तूनुसार शुभ मानले जाते. परंतु घरामध्ये शंख ठेवण्यासाठी काही विशेष नियमांचे पालन केल्यास तुमच्या घरातील सदस्यांमध्ये आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक प्रभाव पाहायला मिळतो. चला तर जाणून घेऊया घरामध्ये शंख ठेवणे का आवश्यक आहे आणि त्याबाबत काय नियम पाळले पाहिजेल.
शंखाचे प्रकार :- शंखामध्ये एकुण दोन प्रकार आहे. दक्षिणावर्ती शंख: याचे तोंड उजवीकडे उघडते आणि ते लक्ष्मी देवीचे रूप मानले जाते. हा शंख पूजेसाठी योग्य मानला जातो. वामावर्ती शंख: याचे तोंड डावीकडे उघडते. हा शंख दुर्मिळ असतो आणि महादेवाला समर्पित केले जाते. या प्रकारचा शंख घरात ठेवण्यापूर्वी एखाद्या तज्ञ किंवा पंडिताचा सल्ला घ्यावा.
शंख ठेवण्याची दिशा आणि ठिकाण :- शंख नेहमी पूजास्थान किंवा घराच्या उत्तर-पूर्व दिशेला (इशान दिशा) ठेवावा. शंख ठेवण्यापूर्वी ती जागा स्वच्छ करून शुद्ध करावी. शंख कधीही थेट जमिनीवर ठेवू नका, तर स्वच्छ कपड्यावर किंवा स्टँडवर ठेवा. शंखाचे तोंड वरच्या दिशेला असावे, त्यामुळे घरात सकारात्मक उर्जा वाहत राहते.
शंख फुंकण्याचे खास नियम :- पूजेत वापरला जाणारा शंख फुंकणे टाळावे. घरात दोन स्वतंत्र शंख ठेवता येतात – एक पूजेसाठी आणि दुसरा फुंकण्यासाठी. पूजेच्या वेळी गंगाजल किंवा पाण्याने शंख भरून देवाला अभिषेक करा. शंख फुंकण्यासाठी सकाळ आणि संध्याकाळ योग्य मानली जाते.
शंख ठेवण्याचे फायदे :
ईशान्य दिशेला शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात. ईशान्य दिशेला शंख ठेवल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. शंखाची आणि देवी लक्षमीची पूजा केल्यामुळे तुम्हाला धन-समृद्धीचा लाभ होतो. शंख वाजवून त्यात भरलेले पाणी शिंपडल्याने घरातील वातावरण शुद्ध होते. आयुर्वेदानुसार शंख पाणी रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करते. शंखध्वनी तणाव कमी करून मानसिक शांती प्रदान करते. शंखाचा योग्य वापर केल्यास घरात शुभ ऊर्जा आणि समृद्धी पसरते.