मोठी बातमी! शरद पवारांची प्रकृती खालावली, दौरे रद्द

मोठी बातमी समोर येत आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या पुण्यामध्ये आहेत. त्यांची प्रकृती खालावली आहे. शरद पवार यांना बरं वाटत नसल्यामुळे त्यांनी आपले पुढचे चार दिवसांचे दौरे रद्द केल्याची माहिती देखील समोर आली आहे. मात्र त्यांना नेमका काय त्रास होतोय याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

सर्व दौरे रद्द 

समोर आलेल्या माहितीनुसार शरद पवार यांची प्रकृती खालावली आहे, त्यांना अस्वस्थ वाटत आहे. त्यामुळे त्यांनी आपले पुढच्या चार दिवसांचे सर्व दौरे रद्द केले आहेत.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)