मालेगाव बँक खात्यांद्वारे कोट्यावधींचा गैरव्यवहार प्रकरण, ईडीची मोठी कारवाई, अखेर आरोपपत्र दाखल

सामान्य तरुणांच्या बँक खात्यांचा गैरवापर करत 14 खाती उघडून सुमारे 1200 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले. मालेगाव येथील व्यापाऱ्याने दोन बँकांमध्ये 14 खाती उघडून सुमारे 1200 कोटींचा आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी शुक्रवारी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आरोपपत्र दाखल केले आहे. मुंबईसह अहमदाबाद परिसरात झालेल्या छापेमारीत 13.5 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या गैरव्यवहारातील मुख्य आरोपी मोहम्मद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याचे साथीदार असून त्याच्या चार साथीदारांना अटक करण्यात ईडीला यश आले आहे. हा गैरव्यवहार तब्बल 1200 कोटी रुपयांचा असल्याचा संशय आहे.

बनावट कंपनीद्वारे 21 बँक खात्यांतून करण्यात आलेल्या 800 कोटी रुपयांच्या व्यवहारांची माहिती ईडीला मिळाली. त्यातील बहुसंख्य कंपन्या एकाच्या मालकीच्या असून त्या नवी मुंबई, सूरत, अहमदाबाद, उत्तर प्रदेश व दिल्ली येथील असल्याचे सूत्रांनी सांगितले होते. मात्र ही रक्कम दहशतवाद फंडिंगशी संबंधित असल्याचा संशयही व्यक्त करण्यात येत आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमन याने नाशिकमधील दोन बँकांमध्ये सुमारे 14 खाती उघडली होती. गरजू तरुणांना विविध आमिष दाखवून त्यांच्या कागदपत्रांच्या मदतीने नाशिक मर्चंट को ऑपरेटिव्ह बँकेत 14 बोगस खाती सुरू करण्यात आली. त्यामध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम ठेवण्यात आली होती. मात्र या रकमेचा गैरवापर केल्याप्रकरणी सिराज मेमन याला स्थानिक पोलिसांनी अटक केली होती. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले होते. तसेच या बेहिशोबी बँक खात्यांमधून पैसे काढून निवडणुकीत गैरवापर केल्याचा आरोप केला होता. पण हे प्रकरण टेरर फंडिंगशी संबंधित असल्याचा संशय आहे. खात्यातील बँक व्यवहारांची सूक्ष्म पडताळणी केली असता त्यातून कोट्यवधी रुपये रोखीने काढण्यात आल्याची बाब ईडीने केलेल्या तपासात स्पष्ट झाली आहे.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)