तामिळनाडूत इंडिया अव्वल,  कर्नाटकात एनडीएला आघाडी, केरळात काय?

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या निकालासाठी अवघे तीन दिवस बाकी आहेत. मतदानाच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. त्यानंतर मतदारांचे डोळे एक्झिट पोलकडे लागले होते. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए आणि महाराष्ट्रात भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी यांची महायुती विजयी घोडदौड कायम राखणार, की इंडिया आघाडी आणि काँग्रेस-ठाकरे गट-शरद पवार यांची महाविकास आघाडी जोरदार कमबॅक करणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

एबीपी आणि सीव्होटर यांच्या एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. दक्षिणेतील राज्यांचे अंदाज समोर येत आहेत. कर्नाटकात एनडीएला २३ ते २५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इंडिया आघाडीला ३ ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशातही एनडीएला २१ ते २५ जागा मिळण्याचं भाकित वर्तवलं जात आहे. तर इंडिया आघाडी खातं उघडण्याची शक्यता कमी वर्तवली जात आहे. तेलंगणात एनडीए आणि इंडिया समसमान जागा मिळवण्याची शक्यता आहे. दोन्ही आघाड्या सात ते नऊ जागा मिळवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Lok Sabha Election Exit Poll 2024: या 8 राज्यांमध्ये भाजपला मिळू शकतात शून्य जागा, जाणून घ्या किती परिणाम होईल
दुसरीकडे, इंडिया आघाडी तामिळनाडूत ३७ ते ३९ जागा मिळवत वरचष्मा कायम राखण्याची शक्यता आहे. मात्र एनडीए दोन जागा मिळवत चंचूप्रवेश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. केरळातही इंडिया आघाडी १७ ते १९ जागा मिळवत अव्वल ठरण्याचे संकेत एक्झिट पोलमध्ये मिळत आहेत. तर एनडीएला ०१ ते ०३ जागा मिळू शकतात.

कर्नाटक (२८)

एनडीए – २३ ते २५
इंडिया – ३ ते ५
इतर – ००

आंध्र प्रदेश (२५)

एनडीए -२१ ते २५
इंडिया – ००
इतर -०० ते ०४

तेलंगणा (१७)

एनडीए – ७ ते ९
इंडिया – ७ ते ९
इतर – ० ते १
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

तामिळनाडू (३९)

एनडीए – ० ते ०२
इंडिया – ३७ ते ३९
इतर – ००

केरळ (२०)

एनडीए – ०१ ते ०३
इंडिया – १७ ते १९
इतर – ००