सांगलीत चंद्रहार पाटील एकाकी? मतमोजणीसाठी उमेदवार प्रतिनिधीच नाही, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : सांगली लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी मधील काँग्रेस आणि शिवसेनेत वाद विकोपाला गेला असतानाच आता पुन्हा मतमोजणी प्रतिनिधीवरून घोळ झाल्याचे उघडकीस आले आहे. मंगळवारी चार जून रोजी होणाऱ्या लोकसभा निवडणूक निकाल २०२४ च्या मतमोजणीसाठी चंद्रहार पाटलांचा एकही उमेदवार प्रतिनिधी नसल्याचे आता उघड झाले आहे. घडलेल्या या प्रकारामुळे आता आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

सांगलीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांना मतमोजणी प्रतिनिधीच मिळाले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चार जून रोजी मिरजेतील वेअर हाऊस मध्ये मतमोजणी पार पडणार आहे. ८४ ईव्हीएम टेबल आणि २० टपाली टेबल अशा एकूण १०४ टेबलवर मतमोजणी घेण्यात येणार आहे.
Medha Kulkarni : अमोल मिटकरी ज्या व्यासपीठावर, तिथे मी जाणार नाही, भाजप खासदार मेधा कुलकर्णींची स्पष्ट भूमिका
या मतमोजणीसाठी प्रत्येक उमेदवाराने मतमोजणी प्रतिनिधी द्यायचे होते. त्यासाठी २७ मे पर्यंत उमेदवार मतमोजणी प्रतिनिधींची यादी मागविण्यात आली होती. परंतु ठाकरेंच्या शिवसेनेचे सांगलीतील उमेदवार चंद्रहार पाटील यांच्याकडून मात्र २७ मे रोजी मतमोजणी प्रतिनिधी यादी देण्यास विलंब झाला. त्यामुळे शासनाकडे चंद्रहार पाटलांच्या प्रतिनिधींची यादीच पोहोचलेली नसल्याचे समजते.

त्यामुळे चंद्रहार पाटील आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन मतमोजणी प्रतिनिधी घेण्याची विनंती करणार असल्याचे देखील समजते. दरम्यान चंद्रहार पाटील यांनी आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन विनंती केली. तर त्यांचा प्रतिनिधी अर्ज देखील स्वीकारला जाऊ शकतो अशी देखील शक्यता आता वर्तवली जात आहे.
Maharashtra Cabinet Expansion : मधाचं बोट अन् शिवलेले कोट; मंत्रिमंडळ विस्ताराची पुन्हा चाहूल, दादा गट-शिंदेंकडून कोण?Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

सांगलीत तिहेरी लढत

सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात चांगलीच रस्सीखेच पाहायला मिळाली होती. उद्धव ठाकरे यांनी पैलवान चंद्रहार पाटील यांना परस्पर उमेदवारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढली होती. अखेर माजी मुख्यमंत्री आणि दिवंगत नेते वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल प्रकाशबापू पाटील यांनी बंडखोरी केली. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे सांगली लोकसभेतील लढत तिरंगी झाली आहे. विशाल पाटलांना काँग्रेसमधून आतून पाठिंबा असल्याचीही चर्चा आहे. तर भाजपकडून विद्यमान खासदार संजयकाका पाटील पुन्हा रिंगणात आहेत.