घरी तयार केलेल्या पदार्थांची चव ही वेगळीच असते. त्यामुळे अनेक लोक घरी बनवलेले पदार्थ खाण्यालाच प्रथम प्राधान्य देतात. चायनीज, इडली, डोसा यासारखे पदार्थही घरी तयार केले जातात. लोखंडी तव्यावर डोसा बनवल्यावर ते त्यावर चिकटतात आणि खराब होऊ लागतात जे अगदी सामान्य आहे. त्यासाठी जाणून घेऊया काही सोप्या आणि प्रभावी टिप्स ज्याच्या मदतीने तुम्ही लोखंडी तव्यावरही डोसा व्यवस्थित बनवू शकता. तेही कुठल्याही त्रासाशिवाय.
लोखंडी तव्यावर डोसा बनवताना थोडेही काही कमी-जास्त झाले तर डोसा तव्यावर चिकटला जातो. यामुळे अनेक जण नॉनस्टिक पॅनचा वापर करतात. पण नॉनस्टिकची किंमत जास्त असल्याने प्रत्येकालाच तो विकत घेणे शक्य होत नाही. जर तुम्हाला ही लोखंडी तव्यावर डोसा बनवायचा असेल तर या टिप्स तुमच्यासाठी नक्की फायदेशीर ठरतील.
कांद्याने तव्याला तेल लावून घ्या
डोसा बनवण्यापूर्वी एक कांदा अर्धा कापून तव्यावर चांगला चोळून घ्या.कांदा तव्याचा पृष्ठभाग गुळगुळीत करतो आणि त्याची लहान छिद्रे बंद करतो. जेणेकरून हे पीठ तव्याला चिकटत नाही.
पाणी आणि तेलाचे एक मिश्रण करा
एका भांड्यात थोडे पाणी आणि तुम्ही वापरत असलेले तेल एकत्र करा. तवा गरम झाल्यावर हे मिश्रण तव्यावर ओता आणि स्वच्छ सुती कपड्याने पुसून घ्या. यामुळे तुमचा तवा गुळगुळीत राहील आणि त्यावर कुठलेही पीठ चिकटणार नाही.
तेल आणि बटाट्याचा वापर
अर्धा बटाटा घ्या. त्याला चाकूच्या टोकावर लावून तेलात बुडवून घ्या आणि नंतर तव्यावर गोल आकारात फिरवून घ्या. यामुळे साधा तवा हा नॉनस्टिक तव्याप्रमाणे काम करू लागतो. इतकच नाही तर यानंतर जेव्हा तुम्ही तव्यावर पीठ टाकाल तेव्हा डोसे अजिबात चिकटणार नाही.
मीठ आणि बर्फाने स्वच्छ करा तवा
डोसा जर तव्याला चिकटत असेल तर त्यावर थोडे मीठ शिंपडा आणि बर्फाच्या तुकड्याने घासून घ्या. यानंतर डिश वॉश आणि स्क्रबर ने तवा स्वच्छ करा. यामुळे तवा संपूर्णपणे स्वच्छ होईल आणि चिकटणार नाही.
मंद आच
डोसा बनवताना मोठ्या आचेवर तवा गरम करा आणि नंतर गॅस मंद आचेवर ठेवा. यानंतर तव्यावर पीठ टाका. मंद आचेवर पीठ सहजपणे पसरते आणि ते चिकटत नाही. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा डोसा उत्तम पद्धतीने बनवू शकता.
डोसा बनवण्यासाठी टिप्स
लोखंडी तवा नॉनस्टिक पॅन सारखा काम करण्यासाठी त्यावर थोडेसे पाणी टाका आणि मग त्यावर तूप किंवा तेल पसरवा. यामुळे तव्याच्या पृष्ठभागावर एक थर तयार होईल आणि तुमचा डोसा न चिकटता तयार होईल. या सोप्या टिप्सचा अवलंब करून तुम्ही तुमचा डोसा उत्तमरीत्या बनवू शकता. पुढच्यावेळी डोसा बनवताना ह्या टिप्सचा वापर नक्की करा.
______________