Sanjay Raut : जागावाटपाला का? कोणामुळे उशीर झाला हे वडेट्टीवारांनीच सांगावं; संजय राऊत यांचं आव्हान

विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा घोळ दोन दिवसांत संपला असता, तर प्रचारासाठी जास्त वेळ मिळाला असता. मात्र जागावाटपात सगळा घोळ घातला गेला, विनाकारण वेळ वाया घालवला असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला होता. त्यावर आता मविआतील प्रमुख पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जागावाटपाची प्रोसेस ज्या पद्धतीन लांबली गेली त्याची गरज नव्हती, हे आमच्या सगळ्यांचच म्हणणं आहे. ती काम, कोणामुळे आणि कशी लांबली, हे बहुतेक विजय वडेट्टीवारांना माहीत असावं. शरद पवार असतील, जयंत पाटील किंवा आम्ही शिवसेनेचे सर्व नेते, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत जागा वाटप संपलेलं नव्हतं हे सत्य आहे. कोणत्याही आघाडीमध्ये जागावाटप इतक्या विलंबाने झालं तर एक अस्वस्थता पसरते, कार्यकर्त्यांना काम करायाला वेळ मिळत नाही. याउलट महायुतीमध्ये साधारण दोन महिन्यांपूर्वी जागावाटपण संपलेलं होतं,बाकी त्यांच्या चर्चा वगैरे सुरू असतीलीही पण जागावाटप संपलं होतं. विजय वडेट्टीवार यांची वेदना आहे ती संपूर्ण मविआची वेदना आहे, असे म्हणत चुका झाल्यात, असं राऊतांनी मान्य केलं. जागावाटपाची प्रक्रिया लांबवण्याची गरज नव्हतीच, याचा पुनरुच्चार राऊतांनी केला. त्या चुका स्वीकारल्या पाहिजे, अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने जागावाटप झालं, आम्ही तेव्हाही सांगत होतो, पण आता त्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही , असं ते म्हणाले.

वडेट्टीवार यांनी कोणाचंही स्पष्टपणे नाव घेतलं नाही, पण आपल्याच सहकाऱ्यांवर संशय व्यक्त केला. त्यावरूनही राऊतांना सवाल विचारण्यात आला. नाना पटोले आणि माझ्यात वाद झाला होता, काँग्रेसला जास्त जागा हव्या होत्या,आणि ( निवडणुकीत) काँग्रेसला सर्वात कमी जागा मिळाल्या. ते कमी जागा जिंकले, आम्हाला 20 जागांवर विजय मिळाला, पण आता त्यावर कशासाठी वाद करायचा. जागावाटपाला विलंब झाला, हाच मुद्दा आहे, असं सांगत त्यांनी वडेट्टीवारांच्या विधानावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला.

(सूचना: ही बातमी विविध स्त्रोतांमधून एकत्रित करण्यात आलेली आहे. आमच्याकडून यामध्ये कोणतेही संपादन केलेले नाही. मूळ स्त्रोतांची माहिती आणि मालकी कायम आहे.)