ठाणे स्थानकातील ६३ तासांच्या ब्लॉकमुळे कल्याण-कसारा-कर्जत मार्गावरील लोकल प्रवाशांचा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंतचा प्रवास धीम्या गतीने होणार आहे. शुक्रवारी मध्यरात्री साडेबारानंतर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते भायखळा आणि वडाळा रोडदरम्यान लोकल वाहतूक बंद राहील. यामुळे उद्या म्हणजेच शनिवारी कर्जत-कसारा मार्गावरील प्रवाशांना भायखळा आणि पनवेल-गोरेगाववरील प्रवाशांना वडाळा रोडपर्यंतच प्रवास करता येणार आहे. शनिवारी धावणाऱ्या रेल्वेफेऱ्या रविवारच्या वेळापत्रकानुसार धावणार असल्याने फेऱ्यांची संख्या कमी असेल.
ठाण्यात ब्लॉक (डाऊन जलद)
स्थानक – कळवा ते ठाणे
मार्ग – अप-डाऊन धीमा आणि अप जलद
वेळ – ३१ मे मध्यरात्री १२.३० वाजता ते रविवार २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम – डाऊन जलद मार्गावरील लोकल/मेल/एक्स्प्रेस पर्यायी मार्गावरून सीएसएमटीपर्यंत चालवण्यात येतील. शनिवारी १६१ लोकल फेऱ्या रद्द राहतील. ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गावरील लोकल फेऱ्या विलंबाने धावतील.
मध्यरात्रीनंतर केवळ भायखळा, वडाळा रोडपर्यंत लोकल
स्थानक – सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड
मार्ग – अप-डाऊन जलद, अप-डाऊन धीम्या, यार्ड मार्गिका
वेळ – १ जून मध्यरात्री १२.३० वाजता ते रविवार २ जून दुपारी ३.३० वाजेपर्यंत
परिणाम – सीएसएमटी ते भायखळा आणि सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल फेऱ्या रद्द राहणार
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
प्रवास कसा करायचा?
– कर्जत-कसारामार्गे येणाऱ्या प्रवाशांना दादर स्थानकातून पश्चिम रेल्वेमार्गे चर्चगेट आणि रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल
– पनवेलहून येणाऱ्या प्रवाशांना वडाळा रोडपर्यंत लोकलने त्यानंतर रस्तेमार्गे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल
– विरार-डहाणू रोडवरून येणाऱ्या प्रवाशांना चर्चगेटमार्गे रस्त्याने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येता येईल