Weather Forecast: मान्सूनची चाहूल, आज केरळमध्ये पाऊस बरसण्याची शक्यता, हवामान विभागाची माहिती

म. टा. वृत्तसेवा, पुणे : ‘अरबी समुद्रात मान्सूनच्या प्रगतीसाठी पोषक स्थिती असून, मान्सून आज, गुरुवारी केरळमध्ये दाखल होऊ शकतो,’ अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) बुधवारी दिली. मान्सूनची प्रगती त्यानंतरही सुरू राहू शकते असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील २४ तासांत केरळमध्ये मान्सूनचे आगमन अपेक्षित असून, त्यापाठोपाठ दक्षिण अरबी समुद्र, लक्षद्वीप बेटे, मध्य व ईशान्य बंगालचा उपसागर आणि ईशान्येकडील काही राज्यांमध्ये मान्सूनचे आगमन होऊ शकते.
Pune Car Accident: पोर्शे अपघाताच्या रात्री आमदाराला सव्वा तासात ४५ मिस्ड कॉल्स; दादांची राष्ट्रवादी गोत्यात

गेल्या दोन दिवसांत केरळमध्ये पावसाने सर्वदूर हजेरी लावली असून, केरळ किनारपट्टीवर ढगांची दाटी दिसून येत आहे. ‘रेमल’ चक्रीवादळानंतर आता नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा प्रवाहही सुरळीत होत असल्याने मान्सूनच्या केरळमधील आगमनासाठी ही पोषक स्थिती असल्याचे ‘आयएमडी’चे म्हणणे आहे. केरळमध्ये बुधवारी दिवसभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी संध्याकाळी साडेपाचपर्यंत एर्नाकुलम येथे १०० मिलिमीटर, कन्नूर आणि अलप्पुळा येथे ९० मिलिमीटर, तर कोल्लम येथे ६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.